
Rohit sharma: नुकताच भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले होते. तर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
तर मालिकेतील अंतिम सामना अनिर्णित राहिला होता. ही मालिका भारतीय संघाने २-१ ने खिशात घातली आहे.
ही मालिका झाल्यानंतर आता वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळताना दिसून येणार नाहीये. आता तो न खेळण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. (Latest sports updates)
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळताना दिसून येणार नाहीये. त्याच्या ऐवजी हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
ज्यावेळी वनडे मालिकेची घोषणा कारण्यात आली होती त्यावेळेस स्पष्ट करण्यात आले होते की, हार्दिक पंड्या पहिल्या वनडे सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. त्याच्याऐवजी हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
आता रोहीत शर्मा बाहेर असण्याचं खरं कारण समोर आलं आहे. रोहित शर्मा पहिल्या वनडे सामन्यावेळी आपल्या मेहुण्याच्या लग्नाला हजेरी लावणार आहे.
काही दिवसांपूर्वी त्याने श्रेयस अय्यरसह शार्दूल ठाकूरच्या लग्नाला देखील हजेरी लावली होती.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका वेळापत्रक
पहिला सामना- १७ मार्च - शुक्रवार, मुंबई
दुसरा सामना - १९ मार्च- रविवार- विशाखापट्टणम
तिसरा सामना - २२ मार्च, बुधवार, चेन्नई
ऑस्ट्रेलिया संघ -
स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन एबॉट, एश्टन एगर, अॅलेक्स केरी, नॅथन एलिस, कॅमरन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.