Wi vs Ind: भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा ३ धावांनी केला पराभव

शेवटच्या चेंडूवर भारताने हा सामना ३ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
Wi vs Ind
Wi vs IndSaam Tv

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला पराभूत केले. त्यानंतर आता टीम इंडियाने (Team India) विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पहिला विजय मिळवला आहे. काल शुक्रवारी क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळलेल्या पहिल्या रोमहर्षक वनडे सामन्यात विंडीजचा ३ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विजयासाठी ३०९ धावांचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाली. ब्रँडन किंग (५४) आणि निकोलस पूरन (२५) यांनी विंडीजला या सामन्यात टिकवून ठेवले.

Wi vs Ind
World Athletics Championship 2022 : नीरज पाठोपाठ भालाफेकीत रोहित यादव चमकला; सहा खेळाडू अंतिम फेरीत

भारताची सहज विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे सामन्यात दिसत होते मात्र्र, अकिल हुसेन (नाबाद ३३) आणि रोमॅरियो शेफर्ड (नाबाद ३९) या दोघांनी सामन्यात चांगली खेळी केली, त्यामुळे टीम इंडीया (Team India) अडचणीत सापडली. शेवटच्या षटकात विंडीजला विजयासाठी १५ धावा हव्या होत्या. वेस्ट इंडिजला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज होती, पण सिराजच्या कामगिरीमुळे विंडीजच्या विजयाच्या आशा मावळल्या. भारताने हा सामना ३ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

भारताने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. या चेंडूवर रोमॅरिओने चौकार मारला, असता तर सामना टाय झाला असता. आणि त्याने षटकार मारला असता तर सामना विंडीजच्या कोर्टात गेला असता. पण तसे झाले नाही.

Wi vs Ind
Neeraj Chopra : नीरज चोप्राची पुन्हा फायनलमध्ये धडक; पहिल्याच प्रयत्नात मैदान मारलं

पहिल्या डावात भारताने प्रथम फलंदाजी करताना विंडीजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताला ही धावसंख्या गाठण्यात यश आले तर त्यात कर्णधार शिखर धवन (९७ धावा) आणि शुभमन गिल (६४) यांनी धावा केल्या, या दोघांनी ११४ करुन भारताला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर श्रेयस अय्यर (५४) यांनीही सुरेख खेळी केली, त्यानंतर दीपक हुडा (२७) आणि अक्षर पटेल (२१) यांनी खालच्या फळीत चांगली कामगिरी केली.

सूर्यकुमार यादव (१३) आणि संजू सॅमसन (१२) धावांवर बाद झाला. भारताला ५० षटकांत ७ गडी गमावून ३०८ धावांपर्यंत मजल मारता आली. विराट कोहलीची फलंदाजी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com