गुजरात विरुद्ध अर्जुन तेंडुलकर खेळणार? मुंबईच्या प्रशिक्षकाचे मोठे विधान

22 वर्षीय अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आयपीएलच्या 15 (IPL 2022) व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा एक भाग आहे.
गुजरात विरुद्ध अर्जुन तेंडुलकर खेळणार? मुंबईच्या प्रशिक्षकाचे मोठे विधान
Arjun TendulkarSaam TV

22 वर्षीय अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आयपीएलच्या 15 (IPL 2022) व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा एक भाग आहे. अर्जुन गेल्या मोसमापासून पदार्पणाची वाट पाहत आहे. आयपीएल 2021 मध्ये देखील अर्जुनला मुंबई इंडियन्सने विकत घेतले होते. परंतु अर्जुनला आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. यावेळी मुंबईने त्याला 30 लाख रुपयांना लिलावात विकत घेतले आहे. मुंबई आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात शुक्रवारी सामना रंगणार आहे. या सामन्यात अर्जुनला आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळू शकते. IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट आहे. यंदाच्या हंगामातून बाहेर पडलेला मुंबई हा पहिला संघ आगे. अशा परिस्थीत संघाचे कोच बेंच स्ट्रेंथ अर्जुनला खेळण्याची संधी देवू शकतात.

अर्जुनच्या पदार्पणा बाबतीत बोलताना मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'ठीक आहे, मला वाटते की संघातील प्रत्येक खेळाडूला पर्याय असतो. गोष्टी कशा पुढे जातात ते पाहू. हे मॅचबद्दल आहे, आम्ही सामना कसा जिंकू शकतो. सामना जिंकणे हे आमचे प्राधान्य आहे.”

Arjun Tendulkar
रवी राणा बाहेर येताच म्हणाले...; पतीला पाहताच नवनीत राणांना अश्रू अनावर

मुंबई इंडियन्सचा संघ नवीन आणि प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो. यावेळी फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा यांना संधी दिली आहे. दोन्ही खेळाडूंनी महत्त्वाच्या क्षणी चांगली कामगिरी केली. अर्जुनच्या प्रश्नावर जयवर्धने पुढे म्हणाला, “खेळात एक आत्मविश्वास असतो. आम्ही आमचा पहिला विजय मिळवण्यात यशस्वी झालो. पुढील सर्व सामने जिंकूण आणि आत्मविश्वास परत मिळवणे हे महत्त्वाचे आहे. सर्वोत्तम खेळाडूंना मैदानात उतरवले जाते. अर्जुन त्यापैकी एक असेल तर आम्ही विचार करू. पण हे सर्व संघ संयोजनावर अवलंबून आहे.

6 मे रोजी मुंबईचा सामना गुजरात टायटन्सशी

या मोसमातील दहाव्या लढतीत मुंबई 6 मे रोजी (शुक्रवारी) गुजरात टायटन्सशी खेळणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. सध्या, मुंबईचे नऊ सामने खेळून केवळ 2 गुण आहेत आणि संघ सध्या पॉईंट टेबलच्या तळाशी आहे. मुंबई संघाने आठ सामने गमावले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.