Shikhar Dhawan News : क्रिकेटचा गब्बर आता राजकारण्याच्या पिचवर करणार फटकेबाजी, आगामी निवडणुकीपूर्वी केले मोठे वक्तव्य..

Shikhar Dhawan In Politics: आएपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
Shikhar Dhawan
Shikhar Dhawan Saam Tv

Shikhar Dhawan Statement On Joining Politics : शिखर धवन हा भारतीय संघातील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. गब्बर नावाने प्रसिद्ध असलेला हा फलंदाज आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

गेल्या काही महिन्यांपासून तो संघाबाहेर आहे. लवकरच तो अॅक्शन मोडमध्ये येणार आहे. आगामी आयपीएल हंगामात तो पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

Shikhar Dhawan
WPL 2023 Prize Money: बाबो! WPL विजेत्या मुंबई इंडियन्सला PSL पेक्षा तिप्पट रकमेचं बक्षीस; आकडा वाचून व्हाल थक्क

नुकताच एका मुलाखतीत शिखर धवनला लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात येण्याच्या त्याच्या योजनांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. सध्या त्याने राजकारणात येण्यासाठी नकार दिला आहे. मात्र तो भविष्यात नक्कीच प्रवेश करेल असं त्याने म्हटले आहे. (Latest sports updates)

याबाबत अधिक बोलताना शिखर धवन म्हणाला की,' सध्या तरी मी याबाबत काहीच विचार केला नाहीये. जर नशिबात असेल तर मी नक्कीच जाईन. मी ज्या क्षेत्रात जातो, त्या क्षेत्रात मी १०० टक्के देत असतो. त्यामुळे मला यश नक्कीच मिळणार.' (Shikhar Dhawan Statement On Joining Politics)

Shikhar Dhawan
MI VS DC FINAL Result: 'दुनिया हिला देंगे' म्हणत मुंबईने घडवला इतिहास! दिल्लीला पराभूत करत पटकावले WPL चे जेतेपद

तसेच तो पुढे म्हणाला की, 'मी वयाच्या ११ व्या वर्षापासून प्रचंड मेहनत करतोय. कुठल्याही क्षेत्रात मेहनत करणं गरजेचं आहे. क्रिकेट हा टीम गेम आहे. त्यामुळे तुम्हाला चांगलंच माहित असतं की, तुम्हाला केव्हा कुठला निर्णय घ्यायचा आहे आणि केव्हा बाहेर पडायचं आहे. आतापर्यंत तरी मी याबाबत कुठलाही विचार केला नाहीये. मात्र देवाची ईच्छा असेल तर मी नक्की जाईन.'

तसेच शुभमन गिल बद्दल बोलताना शिखर धवन म्हणाला की, 'शुभमन आधीपासून वनडे आणि टी -२० क्रिकेट खेळतोय आणि चांगली कामगीरी देखील करतोय. मी जरी भारतीय संघाचा कर्णधार किंवा निवडकर्ता असतो, तरी मी त्याला संधी दिली असती.' शिखर धवनला भारतीय संघात पुनरागमन करण्याची चांगली संधी असणार आहे. कारण आता आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यास त्याची भारतीय संघात प्रवेश करण्याची दारं उघडू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com