Wimbledon 2023 Prize Money: Wimbledon जिंकणारा होणार मालामाल! विजेत्या खेळाडूला मिळणार तब्बल इतकी रक्कम

Wimbledon 2023: ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम मिळणार आहे? तसेच उपविजेत्या खेळाडूला किती रक्कम मिळणार आहे? जाणून घ्या.
wimbeldon 2023s
wimbeldon 2023ssaam tv

Wimbledon 2023 Cash Prize: विम्बल्डन २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. जगभरातील क्रीडा प्रेमींची नजर या स्पर्धेवर असणार आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का, ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम मिळणार आहे? तसेच उपविजेत्या खेळाडूला किती रक्कम मिळणार आहे? जाणून घ्या.

wimbeldon 2023s
IND vs WI 1st Test: पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा! विस्फोटक खेळाडूचं संघात कमबॅक

कोणाला किती रक्कम मिळणार?

विम्बल्डन २०२३ (Wimbledon 2023) स्पर्धेत उपविजेत्या राहणाऱ्या खेळाडूला १२.२५ कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच बक्षिसाची ४६५ कोटी रक्कम ही खेळाडूंमध्ये विभागली जाणार आहे. गतवर्षी महिला आणि पुरुष विजेत्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला २०.८५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले गेले होते. यावर्षी बक्षिसाची रक्कम ११ टक्क्यांनी वाढवून दिली जाणार आहे. मात्र तुम्हाला आश्चर्य होईल की, १९६७ पर्यंत खेळाडूंना पैसे दिले जात नव्हते. (Latest sports updates)

wimbeldon 2023s
WI vs IND: कसोटी मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज! धमकी देत म्हणाला...

नोवाक जोकोविचच्या कामगिरीवर असेल लक्ष...

विम्बल्डन २०२२ स्पर्धेवर नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) नाव कोरलं होतं. जोकोविचने अंतिम सामन्यात निक किर्गीओसचा धुव्वा उडवत जेतेपदाला गवसणी घातली होती. यासह त्याने सातव्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यासह ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्येही त्याचा दबदबा राहिला आहे.

मुख्य बाब म्हणजे गेल्या ४ वर्षांपासून तो सलग जेतेपदाचा मानकरी ठरतोय. यावेळेस तो आपलं जेतेपद स्वतःकडेच ठेवणार की त्याचं जेतेपद जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावेळेस दमदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मात्र त्याचा फॉर्म पाहता यावेळेसही जेतेपद मिळवण्यासाठी त्याला प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com