WPL 2023: शेवटच्या षटकात DRS.. WPLच्या 'या' नव्या नियमामुळे भंगले गुजरातच्या पहिल्या विजयाचे स्वप्न

युपी वॅरियर्स संघासाठी विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील एक नियम फायदेशीर ठरला आहे.
UPW VS GG
UPW VS GGSaam Tv

GG VS UPW: विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रविवारी रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या रोमांचक सामन्याचा निकाल शेवटच्या षटकात लागला. युपी वॉरियर्स संघातील फलंदाजाने षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात युपी वॉरियर्स संघातील फलंदाज ग्रेस हॅरिसने तुफानी खेळी केली. तिने शेवटच्या षटकात १९ धावांची गरज असताना तुफानी खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान युपी वॅरियर्स संघासाठी विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील एक नियम फायदेशीर ठरला आहे. (Latest sports updates)

UPW VS GG
WPL 2023: आधी RCBची केली धुलाई मग मैदानावरच केला भांगडा! २२ वर्षीय जेमिमाचा डान्स पाहून पडाल तिच्या प्रेमात : VIDEO

विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या स्पर्धेत वाईड किंवा नो चेंडूसाठी देखील खेळाडू डीआरएसची मागणी करू शकणार आहेत. शेवटचे षटक सुरु असताना जेव्हा अंपायरने वाईड चेंडू देण्यास नकार दिला, त्यावेळी ग्रेस हॅरिसने डीआरएसची मागणी केली. डीआरएसमध्ये पाहिलं असता चेंडू वाईड असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला.

UPW VS GG
WPL 2023: शफाली वर्मानं RCB ला धू धू धुतलं, 45 चेंडूत ठोकल्या 84 धावा; स्मृती मंधनाच्या संघासमोर विजयासाठी भलंमोठं लक्ष

शेवटच्या षटकात काय घडलं?

१९.१ : ६ धावा

१९.२ : वाईड चेंडू (गुजरातने केली डीआरएसची मागणी)

१९.२ : २ धावा

१९.३ : ४ धावा

१९.४ : वाईड चेंडू ( युपीने केली डीआरएसची मागणी)

१९.४: ४ धावा

१९.५ : ६ धावा

या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या होत्या. हे आव्हान युपी वॅरियर्स संघाने १ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले. या स्पर्धेत खेळाडू वाईड आणि नो चेंडूसाठी देखील डीआरएसची मागणी करू शकणार आहेत.

यापूर्वी केवळ फलंदाज बाद आहे की नाही हे पाहण्यासाठी डीआरएसची मागणी केली जायची. मात्र विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत नवीन प्रयोग केला जात आहे. हा प्रयत्न जर यशस्वी ठरला तर आयपीएल स्पर्धेत देखील हा नियम लागू केला जाऊ शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com