World Cup 2023 Schedule: महाराष्ट्रातील ३ शहरात रंगणार वर्ल्ड कपचे सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

ICC World Cup 2023 Schedule: क्रिकेट चाहत्यांच्या नजरा विश्वचषक स्पर्धेकडे लागल्या आहेत. याचदरम्यान, २०२३ विश्वचषक स्पर्धेचे तीन सामने महाराष्ट्रात होणार आहे, अशी माहिती 'स्पोर्टकिडा'ने दिली आहे.
World Cup 2023 Schedule
World Cup 2023 ScheduleSaam tv

2023 Cricket World Cup: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच बीसीसीआयकडून जाहीर करण्यात येणार आहे. आज आयपीएलचा अंतिम सामना पार पडणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा विश्वचषक स्पर्धेकडे लागल्या आहेत. याचदरम्यान, २०२३ विश्वचषक स्पर्धेचे तीन सामने महाराष्ट्रात होणार आहे, अशी माहिती 'स्पोर्टकिडा'ने दिली आहे. (Latest Marathi News)

यंदा भारतात आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

World Cup 2023 Schedule
IPL 2023 Final Scenarios: पाऊस पडला की कोण जिंकणार? चेन्नई की गुजरात? समजून घ्या सामन्याचं समीकरण एकाच क्लिकवर

स्पोर्ट्सकिडाने दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी होऊ शकते. तर १९ नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे.

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम या स्पर्धेचा अंतिम सामना देखील याच मैदानावर खेळावला जाऊ शकतो. हा सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाऊ शकतो.

World Cup 2023 Schedule
World Cup 2023 ScheduleSaam tv

भारतात आयोजित होणाऱ्या या स्पर्धेतील सामने १५ वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जाऊ शकतात. ज्यात ३ नॉकआउटसह ४८ सामन्यांचा समावेश असणार आहे. अहमदाबादसह दिल्ली, लखनऊ, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाळा, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, इंदूर, राजकोट आणि मुंबईत हे सामने खेळवले जाऊ शकतात.

World Cup 2023 Schedule
CSK vs GT,IPL Final 2023: फॅन्ससाठी गुड न्यूज! सामना पुढे ढकलताच BCCI ने घेतला मोठा निर्णय

या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघात अहमदाबादमध्ये होणार आहे. तर १५ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना होणार आहे. त्यामुळे आता साऱ्या क्रिकेट प्रेमीच्या नजरा विश्वचषक स्पर्धेकडे लागल्या आहेत. दरम्यान, बीसीसीआय या विश्वचषक स्पर्धेबद्दल अधिकृत माहिती आजच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर देणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com