DCW vs MIW: आज मुंबईचा सामना दिल्लीशी! दोन्ही टेबल टॉपर भिडणार; नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने..

पहिले दोन्ही सामने जिंकून महिला आयपीएलच्या गुणतालिकेत टॉपवर असणारे मुंबई आणि दिल्ली हे संघ एकमेंकाविरुद्ध आज मैदानात उतरणार आहेत.
WPL 2023
WPL 2023

WPL 2023 MI-W vs DC-W: आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना खूप रोमांचक होणार आहे. कारण आतापर्यंत दोन्ही संघांनी या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. अशा स्थितीत मुंबई आणि दिल्ली आपला विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी पाहतील. मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला हा सामना संध्याकाळी साडेसातला डॉ.डीवाय पाटील स्टेडियम मुंबई येथे खेळला जाणार आहे. (Cricket News)

WPL 2023
Mohammed Shami VIDEO: शमीच्या सुस्साट बॉलवर दांडी गूल! बॅट्समन बघतच राहिला

नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने संघात एक बदल केला. अरुंधती रेड्डीच्या जागी मिन्नू मणीचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने एकही बदल केला नाही.

दोन्ही संघ तगडे...

मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने आतापर्यंत संघासाठी जबरदस्त खेळ करत नेत्त्वही उत्तम केलं आहे. ज्यामुळे पहिल्या सामन्यात गुजरातला 143 धावांनी मात दिल्यावर मुंबईने दुसऱ्या सामन्यात आरसीबीला 9 विकेट्सनी मात दिली. दुसरीकडे दिल्ली संघाने पहिल्या सामन्यात आरसीबीला 60 धावांनी पराभूत करत दुसऱ्या सामन्यात युपी संघाला 42 धावांनी पछाडलं आहे. आता दोघेही गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. दोघांनी दोन-दोन सामने जिंकले असले तरी मुंबईचा नेटरनरेट +5.185 तर आरसीबीचा नेटरनरेट +2.550 इतका असल्याने मुंबई एक नंबरला तर बंगळुरु दोन नंबरवर आहे.

WPL 2023
Ind vs Aus 4th test: भारतीय गोलंदाज दमले...उस्मान ख्वाजाचं शतक; ऑस्ट्रेलियानं पहिला दिवस गाजवला, बघा स्कोअरकार्ड...

दोन्ही संघाची प्लेईंग ११..

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), मिन्नू मणी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com