कुस्तीपटूचा मान मुरगळल्याने मैदानावरच तडफडून मृत्यू; पाहा Video

उत्तर प्रदेशचा मुरादाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
कुस्तीपटूचा मान मुरगळल्याने मैदानावरच तडफडून मृत्यू; पाहा Video
कुस्तीपटूचा मान मुरगळल्याने मैदानावरच तडफडून मृत्यू; पाहा VideoSaam Tv

उत्तर प्रदेशचा मुरादाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कुस्ती खेळताना एका पैलवानाचा मैदानातच तडफडून मृत्यू झाला. एका पैलवाने आपल्या प्रतिस्पर्धी पैलवानाला अवघ्या ५ सेकंदात उचलून धोबीपछाड केला. यात त्याने प्रतिस्पर्धी पैलवानाची मान मुरगळली. यामुळे तडफडून त्या पैलवानाने मैदानातच प्राण सोडले आहे. या घटनेचा व्हिडिओ बुधवारी संध्याकाळी सोशियल मीडियावर व्हायरल झाला होता.

परवानगी नसतानाही या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घटनास्थळी कोणीच प्रशिक्षित कोच उपस्थित नव्हते. या घटनेनंतरही अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही.

धक्कादायक बाब म्हणजे पैलवानाच्या मृत्यूनंतर गावात पंचायत बसवली गेली. यानंतर मृत पैलवानाच्या कुटुंबीयांना ६० हजार रुपये देवून प्रकरण स्वतात मिटवण्यात आलं. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिस अधीक्षक विद्यासागर मिश्र यांनी या प्रकरणी चौकशीचे केल्याचे सांगितले आहे. दरम्यान, फरीदनगर गावात २ सप्टेंबरला कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेसाठी आयोजकांनी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. विशेष म्हणजे माती कुस्तीसाठी आवश्यक असलेली मातीही तयार केलेली नव्हती.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com