ऑस्ट्रेलियाचा विजय अन् WTC च्या गुणतालीकेत बदल; भारताचे स्थान जैसे थे!

श्रीलंकेने वेस्ट इंडिजविरुद्धचे (West Indies) दोन्ही सामने जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात 24 गुण आहेत.
ऑस्ट्रेलियाचा विजय अन् WTC च्या गुणतालीकेत बदल; भारताचे स्थान जैसे थे!
ऑस्ट्रेलियाचा विजय अन् WTC च्या गुणतालीकेत बदल; भारताचे स्थान जैसे थे!Saam TV

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या अॅशेस कसोटीत जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडवर २७५ धावांनी शानदार विजय मिळवून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत दुसरे स्थान मजबूत केले आहे. श्रीलंका (Shri Lanka) अजूनही अव्वल स्थानावर आहे तर विराट कोहलीची टीम इंडिया चौथ्या स्थानावर आहे. सलग दोन विजयांसह ऑस्ट्रेलिया श्रीलंकेच्या बरोबरीने आहे. परंतु श्रीलंका अव्वल आहे. श्रीलंकेने वेस्ट इंडिजविरुद्धचे (West Indies) दोन्ही सामने जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात 24 गुण आहेत.

पाकिस्तान (Pakistan) आतापर्यंत खेळलेल्या चार कसोटींपैकी तीन विजय आणि एका पराभवासह तिसर्‍या क्रमांकावर आहे. बांगलादेशवर 2-0 ने क्लीन स्वीप केल्याने त्यांना भारताला मागे टाकण्यात मदत झाली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील टीम इंडिया (Team India) विक्रमी चौथ्या स्थानावर आहे. सध्या भारतीय संघात आणि बीसीसीआयमध्ये वाकयूद्ध सुरु आहे. विराट कोहलीला वनडेच्या कर्णधार पदावरुन तडकाफडकी काढण्यात आले त्यानंतर विराट कोहली आणि सौरव गांगुलीमध्ये आरोप- प्रत्यारोप रंगले.

दरम्यान मागच्या WTC 2021 मध्ये भारतला न्युझीलंडच्या संघाने आसमान दाखवले होते. भारत विजयाचा प्रबळ दावेदार समजला जात होता. परंतु न्युझीलंडने आपल्या खेळाची करामत दाखवत सामना जिंकला होता. तेव्हाही विराट कोहली वरती भरपूर टीका झाली होती. आता यंदाची WTC Final कोण खेळणार हे आगामी काळात निश्चीत होईल.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com