Yashasvi Jaiswal Record: जयस्वालची 'यशस्वी' घौडदौड सुरूच! विराट अन् रोहितलाही नाही जमलं, ते पठ्ठ्याने करून दाखवलं

Yashasvi Jaiswal: नुकताच त्याने एक मोठा विक्रम मोडून काढला आहे.
yashasvi jaiswal
yashasvi jaiswaltwitter

RR VS SRH IPL 2023: राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा मुंबईकर यशस्वी जयस्वाल सध्या मैदान गाजवतोय. आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याने तुफान फटकेबाजी करत सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याची यशस्वी कामगिरी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील पाहायला मिळाली आहे. नुकताच त्याने एक मोठा विक्रम मोडून काढला आहे.

वानखेडेवर शतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वालला हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. त्याने ३५ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली. मात्र याच ३५ धावांच्या खेळीच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत मोठा कारनामा केला आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीत वैयक्तिक १००० धावा पूर्ण केल्या आहेत.

yashasvi jaiswal
IPL Mystery Girl: ती होती हजर अन् कॅमेरामनची पडली नजर! जुही सोबत दिसलेली ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण?

जयस्वालची यशस्वी कामगिरी...

यशस्वी जयस्वालने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध फलंदाजी करताना आयपीएल कारकिर्दीत १००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो दुसरा सर्वात युवा खेळाडू आहे.

यशस्वीने हा कारनामा वय २१ वर्षे १३० दिवस असताना केला आहे. तर या यादीत रिषभ पंत अव्वल स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या रिषभ पंतने वय २० वर्षे २१८ दिवस असताना हा कारनामा केला होता.

या यादीत पृथ्वी शॉ, संजू सॅमसन, शुभमन गिल आणि देवदत्त पडीक्कल यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. (Latest sports updates)

yashasvi jaiswal
Rashid Khan Catch Video: लईच भारी ! राशिद खानने टिपला ‘कॅच ऑफ द सिझन’,व्हिडिओ पाहून व्हाल अवाक् - VIDEO

या मोठ्या विक्रमाच्या यादीत मिळवले दुसरे स्थान..

यशस्वी जयस्वालने १००० धावा पूर्ण करताच त्याच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो आयपीएल स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने ३४ इनिंगमध्ये हा कारनामा केला आहे. तर आतापर्यंत त्याने या स्पर्धेत १००५ धावा केल्या आहेत.

राजस्थानने उभारला २१४ धावांचा डोंगर..

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून जोस बटलरने सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली.

या खेळी दरम्यान त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले. तर कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ६६ धावांची खेळी केली. तसेच सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने ३५ धावांचे योगदान दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com