Rishabh Pant: कॅन्सरला मात देणाऱ्या युवीने वाढवला रिषभ पंतचा उत्साह,खास फोटो शेअर करत दिले हटके कॅप्शन -PHOTO

Yuvraj Singh Meet Rishabh Pant: भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने रिषभ पंतची भेट घेतली आहे.
Rishabh pant and yuvraj singh
Rishabh pant and yuvraj singh Instagram

Yuvraj Singh Instagram Post: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा काही महिन्यांपूर्वी कार अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती.

आता तो दुखापतीतून सावरताना दिसून येत आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात तो स्विमिंग पूलमध्ये चालताना दिसून आला होता.

तर त्याचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Rishabh pant and yuvraj singh
IND Vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाची आता काही खैर नाही! टीम इंडियाला एकहाती सामना जिंकून देणारा खेळाडू परतलाय

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने रिषभ पंतची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो युवराज सिंगने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोला त्याने हटके कॅप्शन देखील दिले आहे. त्याने लिहिले की, 'त्याला भेटून आनंद झाला. पंत हा मजेशीर आणि सकारात्मक दृष्टकोन असलेला व्यक्ती आहे.'

रिषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसत नसला तरीदेखील तो सोशल मीडियाद्वारे नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत जोडलेला असतो. (Latest sports upates)

आपल्या तब्यतीत सुधारणा झाल्याची अपडेटही तो सोशल मीडियाद्वारे देत असतो.

काही दिवसांपूर्वीच त्याने लिगामेंट टियरच्या संबंधित असलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली होती. यासह चाहत्यांचे आभारही मानले होते.

Rishabh pant and yuvraj singh
IND vs AUS : कसोटीपाठोपाठ वनडेतूनही KL Rahul चा पत्ता कट? हार्दिक पांड्या हुकुमी एक्क्याला देणार संधी!

केव्हा परतणार रिषभ पंत?

सध्या रिषभ पंत आपली फिटनेस पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे तो केव्हा परतणार याबाबत कुठीलीही माहिती समोर आली नाहीये.

तो आगामी आयपीएल स्पर्धेत देखील खेळताना दिसून येणार नाहीये. त्याच्या ऐवजी डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com