
मुंबई - भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या घरी 25 जानेवारी 2022 रोजी एक नव्या पाहुणायचे आगमन झाले. अभिनेत्री हेजल कीचने एका मुलाला जन्म दिला. युवराज क्वचितच त्याचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर शेअर करतो. पण चाहते त्याच्या मुलाची एका झलक पाहणायसाठी आतुर होते.अलीकडेच युवराजने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो त्याच्या मुलासोबत दिसत आहे.
हा एक प्रमोशनल व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये युवराज वडील झाल्यानंतरच्या भावनाही कथन करत आहे. व्हिडिओमध्ये युवराजच्या मुलाचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. काही फोटोंमध्ये युवराजचा मुलगा त्याच्या मांडीवर दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही फोटोंमध्ये युवराजच्या मुलाचे हॉस्पिटलमधील फोटो देखील आहे ज्यामध्ये हेजल देखील दिसून येत आहे.
युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 30 नोव्हेंबर 2016 रोजी लग्न केले. लग्नाच्या 5 वर्षानंतर, दोघेही जानेवारी 2022 मध्ये आणि वडील झाले. आता तब्बल तीन महिन्यांनंतर युवराज सिंगने पहिल्यांदाच आपल्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.