VIDEO | सुतळी बॉम्बशी मस्करी तरूणाच्या अंगलट

VIDEO | सुतळी बॉम्बशी मस्करी तरूणाच्या अंगलट

मस्करीची कुस्करी झाली म्हणजे नेमकं काय झालं हे या तरूणाकडे पाहिल्यानंतर लक्षात येईल. परभणीतल्या पाथरी गावच्या सय्यद अक्रमनं एक चूक केली आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचं तोंड फुटलं. सय्यद आपल्या कुटुंबासह हैद्राबादला निघाला होता. परळी स्थानकात ट्रेन थांबली असता त्यानं सुतळी बॉम्ब तोंडात घेऊन पेटवण्याचा प्रयत्न केला. या बॉम्बचा स्फोट झाला आणि सय्यदच्या तोंडाची गंभीर अवस्था झाली. या स्फोटानंतर स्टेशनवर काही काळ घबराट पसरली होती. 


मुळात कोणतेही स्फोटक पदार्थ रेल्वेतून नेण्यास बंदी असताना अक्रमजवळ हा सुतळी बॉम्ब आला कुठून ? त्यानं ट्रेनमध्ये बॉम्ब फोडण्याचं धाडस केलच कसं ? आणि हा जर मस्करीचा भाग होता तर तोंडात बॉम्ब फोडतेवेळी त्याला कुणीच कसं रोखलं नाही ? हे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतायेत. एक चूक या तरूणाचं भविष्य उध्वस्त करून गेलीय. त्यामुळे तुम्ही अशी चूक कधीच करू नका...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com