‘कृषी संजीवनी’साठी मुदतवाढ हवी - पतंगराव कदम!!!

‘कृषी संजीवनी’साठी मुदतवाढ हवी - पतंगराव कदम!!!

कडेगाव - शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना राबविली. १ नोव्हेंबरला सुरू झालेली योजना ३० नोव्हेंबर २०१७ रोजी बंद झाली. शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही ऊसबिल जमा झाले नाही. तसेच कर्ज माफीची रक्कमही जमा झालेली नाही. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांकडे शेतीची वीजबिले भरण्यासाठी पैसे  उपलब्ध नसल्याने ते कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या योजनेची मुदत मार्च २०१८ पर्यंत वाढवावी, असे मत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी येथे व्यक्त केले.                               

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com