भारताचा चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक, पबजीसह आणखी 118 चायनिज अॅप्सवर बंदी

भारताचा चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक, पबजीसह आणखी 118 चायनिज अॅप्सवर बंदी

भारतानं चीनला मोठा दणका देत दुसऱ्यांदा डिजिटल स्ट्राईक केलाय. केंद्र सरकारकडून 118 चायनिज एप्सवर बंदी घालण्यात आलीय. विशेष म्हणजे पब्जी मोबाईल गेमवरही बंदी घालण्यात आलीय. यापूर्वी 60 हून अधिक चायनिज अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मोदी सरकारनं 118 चायनिज अॅप्सवर बंदी घातलीय. 

पाहा सविस्तर व्हिडिओ -

 गेल्या काही महिन्यांपासून चीन भारतासह अनेक देशांना त्रासदायक ठरतोय. व्यापारी, भौगोलिक पातळ्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी चीन एकाचवेळी अनेक देशांची डोकेदुखी वाढवतोय. त्यामुळे चीनच्या दादागिरीला वेसण घालण्यासाठी अनेक देशांनी एकत्र येत नाटोच्या धर्तीवर क्वाडचं हत्यार उपसलंय.

चिनी दादागिरीला क्वाडची वेसण
चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी आता क्वाड कार्यरत होणार असून, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी चीनविरोधात वज्रमूठ उगारलीय. त्याचप्रमाणे, या चारही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीत बैठक होणारेय. या बैठकीत चीनची दादागिरी रोखण्याबाबत चर्चा होणारेय. तूर्तास क्वाडमध्ये 4 देश असले तरी भविष्यात इतरही देशांचा समावेश होऊ शकतो. 

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या नेतृत्वात कम्युनिस्ट सेव्हिएत युनियनविरोधात 12 देशांनी नोटाची स्थापना केली, त्यात नंतर 15 देशांचा समावेश झाला. त्याचपद्धतीने क्वाडचीही पुढची वाटचाल असणार आहे. क्वाडसमोर चीनची युद्धखोरी रोखण्याचे लक्ष्य असेलच, पण त्याचसोबत चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठीही क्वाड रणनिती आखणार आहे. त्यामुळे, कोरोनाच्या संकटात जगाला ढकलूनही इतर देशांना विनाकारण त्रास देणाऱ्या चीनची मुस्कटदाबी आता लवकरच हाणारेय.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com