..अखेर 'त्या' फरार सहाय्यक पोलिस निरिक्षकाला करण्यात आली अटक..

..अखेर 'त्या' फरार सहाय्यक पोलिस निरिक्षकाला करण्यात आली अटक..
Handcuffs

गोंदिया : जिल्ह्याच्या Gondia आमगाव पोलिस स्टेशन Police Station मध्ये आरोपीला मारहाणीत मृत्यु प्रकरणात Custodial Death अखेर आमगांव पोलिस स्टेशन चे फरार Absconding सहाय्यक पोलिस निरिक्षक महावीर जाधव यांना अखेर अटक Arrest करण्यात आली असून ह्या प्रकारणात अटक करण्यात आलेल्या आरोपीची संख्या 5  झाली आहे. Assistent Police Inspector In Custodial Death in Gondia Arrested

गोंदिया जिल्हातील आमगाव पोलिस स्टेशन अंतर्गत  कुंभारटोली येथील अनेक गुन्हात अटक केलेला आरोपी राजकुमार अभयकुमार धोती याचा पोलीस कोठडीत पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे सीआयडीत तपासात सिद्ध झाल्याने अखेर  या प्रकरणात तपासाअंती  पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक सह पाच पोलीसांवर खुनाचा गुन्हा  दाखल करण्यात आला होता.

हे देखिल पहा

एकाचवेळी पाच पोलीसांवर खुनाचा गून्हा दाखल करून अटक करण्याची जिल्ह्यातील ही पहीलीच घटना आहे.त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ माजली होती,सदर प्रकरणात आरोपी पोलीस निरीक्षक सुभाष चौहान, सहायक पोलिस निरीक्षक महावीर जाधव,पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके,दत्तातय कांबळे यांच्याविरोधात भादवी कलम 302,330,34 अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. Assistent Police Inspector In Custodial Death in Gondia Arrested

यापैकी पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव पसार झाले होते. त्यांना अटक करण्यात आली नव्हती, मात्र आता फरार सहाय्यक निरिक्षक महावीर जाधव यांना अटक करण्यात आली असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून 3 जून पर्यंत पीसीआर देण्यात आला आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com