आॅनलाईन शाॅपिंगचा नाद पडला काँन्स्टेबलला लाखांत 

आॅनलाईन शाॅपिंगचा नाद पडला काँन्स्टेबलला लाखांत 
Online Shopping

मुंबई : मुंबईत Mumbai कोरोनाच्या Corona पार्श्वभूमिवर सध्या सर्वञ दुकानं बंद असल्यानं आॅनलाईन खरेदीवर सध्या सर्वांचा भर आहे. पण आॅनलाईन खरेदी Online Shopping करताना सावधान राहणंही तितकचं गरजेच आहे. चेंबूर Chembur येथील बी.ए.आर.सी येेेेेेथील आय.एस.एफ. या केंद्रिय दलामध्ये काँन्स्टेबलची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. BARC Constable Cheated on the name of online Shopping

आॅनलाईन साडी खरेदीच्या नादात चोरट्यांनी त्याचे अकांऊट Account साफ करत, त्याच्या खात्यातून तब्बल 1 लाख 23 हजार 999 रुपये काढले आहेत. याबाबत त्याने ट्राँम्बे, पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हे देखिल पहा

चेंबूरच्या बी.ए.आर.सी. मध्ये आय.एस.एफ. या केंद्रिय बलामध्ये काँन्स्टेबलची नोकरी करत असलेल्या दिपेश (नाव बदललं आहे) यांनी 9 मे रोजी "फ्लिप कार्ड" या आँनलाईन पोर्टलहून पत्नीसाठी 9 हजार 89 रुपयांच्या दोन महागड्या साड्या मागवल्या,  दिपेश यांच्या बँकेतील खात्याला त्यांचा मोबाइल नंबर लिंक केलेला आहे.BARC Constable Cheated on the name of online Shopping

त्यामुळे त्या खात्यावरून होणाऱ्या प्रत्येक खात्याची माहिती दिपेश यांना त्यांच्या मोबाइलवर येते. त्यानुसार दिपेश यांनी आँनलाईन मागवलेल्या साड्या  13 मे रोजी दुपारीपर्यंत दिपेश यांच्या घरच्या पत्त्यावर प्राप्त होतील. असा मेसेज त्यांना आला होता. माञ साड्या न आल्याने दिपेश यांनी flipkart शी चटिंग व्दारे संपर्क करून त्यांच्या सर्विस विषयी नाराजी व्यक्त केली. 

दिपेश यांनी नोंदवलेल्या नाराजीनंतर त्यांना एक फोन आला व सायंकाळ पर्यंत तुमच्या साडया मिळून जातील. असे  सांगितले गेले.  माञ त्यातून समाधान न झाल्याने दिपेश यांनी त्यांच्याजवळून  साडया पोचवणा-या डिलिव्हरी बाँयचा मोबाइल क्रमांक मागितला असता. दिपेश यांना तो देण्यात आला. त्यानंतर दिपेश त्यांची आँर्डर ट्रॅक करीत असताना. त्यांना एका शिपिंग कंपनीची माहिती मिळाली. त्यांच्या टोल फ्री क्रमांक वेबसाइटवरून दिपेश यांनी मिळवला.

त्यावर दिपेश यांनी  मोबाइल वरून संपर्क साधत, आॅर्डर डिलिव्हर करणा-या डिलिव्हरी बाँयचा मोबाइल क्रमांक मागितला. तेव्हा दिपेश यांना डिलिव्हरी बाँयचा क्रमांक न देता तुमचा पत्ता निश्चित नसल्याने तो अगोदर अद्ययावत करा. असे सांगून त्यासाठी एका मोबाइल क्रमांकावरून पत्ता अद्ययावत करण्यासाठी एक दिपेश यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठविली. तसेच त्यावरून सुरूवातीला  पाच रूपयाचे ट्रान्झकशन डेबिट करावयास सांगितले. पण सदरचे ट्रॅन्झॅकशन पुर्ण झाले नसल्याचे सांगत, फोन वरील व्यक्तीने पून्हा मोबाइल मध्ये एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. BARC Constable Cheated on the name of online Shopping

त्याप्रमाणे दिपेश यांनी ते अँप प्ले स्टोअर वरून डाउनलोड केले. त्या अॅपमध्ये सांगितल्यानुसार स्टेप करत गेले असता दिपेश यांच्या खात्यातून सुरवातीला 50 हजार काढण्यात आले. तेव्हा दिपेशने पून्हा फोन करुन विचारणा केली असता तुम्हाला रिफंड करतो. असे सांगत पुन्हा एक प्रक्रिया सांगितली. ती केल्यानंतर पून्हा दिपेश यांच्या खात्यातून 49 हजार काढले गेले. त्यानंतर पून्हा काढण्यात आलेल्या पैशांबाबत विचारणा केली असता. त्या व्यक्तीने पून्हा तीच प्रक्रिया करण्यास सांगितली.

त्यावेळी दिपेशच्या खात्यातून 24 हजार 99 रुपये डेबिट झाले. याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता. त्यांना पून्हा तशा प्रकारे संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया करण्यास सांगीतली. समोरच्या व्यक्तीवर संशय आल्याने त्यांनी त्यांचे व्यवहार खाते बंद करून पोलिसात तक्रार नोंदवली. या फसवणूकी दरम्यान पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून नागरिकांनी आँनलाईन शाँपिक करताना काळजी घ्यायला हवी. बँक खात्यास संदर्भातील महत्वाची माहिती फोनवर शेअर करू नये. असे आवाहन करत या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com