चीनने असा केला भारतीयांच्या श्रद्धाळूपणाचा वापर

चीनने असा केला भारतीयांच्या श्रद्धाळूपणाचा वापर

कोरोनाचं संकट चीनमधून जगभरात पसरल्यानंतर आणि चीननं आकड्यांची लपवाछपवी केल्यानंतर जगभरात चीनकडे संशयाने बघितलं जाऊ लागलंय. त्यातच जगाच्या बाजारपेठेवर राज्य करण्याचा चीनचा हव्यासही लपून राहिलेला नाही. त्यामुळे चीनने जगभरातील देशांच्या बाजारपेठांवर कसा ताबा मिळवला याबाबत काही गोष्टी समोर आल्यायत. चीननं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने अनेक देशांच्या बाजारपेठांमध्ये शिरकाव केलाय.

चीननं कसं केलं आपल्या सण आणि संस्कृतीवर आक्रमण?

चीननं आधी भारतीयांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. भारतीयांची उत्सवप्रियता आणि भारताची सण साजरे करण्याची संस्कृती चीननं हेरली. त्यानंतर भारतीय सणांना आवश्यक अशा वस्तू बनवण्याचा उद्योग चीननं सुरू केला. दिवाळीत वापरल्या जाणाऱ्या पणत्या, आकाशकंदील, दीपावली आणि गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माळा अशा वस्तू चीनच्या कंपन्यांनी भारतात आणल्या. रंगांच्या पिचकाऱ्या, हळदी-कुंकूसारख्या समारंभात वापरली जाणारी भांडी, फटाके अशाही वस्तू चीननं भारतीय बाजारपेठांमध्ये आणल्या. इतकंच काय तर दिवाळीतलं सुगंधी उटणंही चीननं भारतात विकलं. 

चीन भारतीय बाजारात विकत असलेल्या या वस्तूंचा चीनमध्ये कसलाही वापर होत नाही, मात्र केवळ भारतीय बाजारपेठेवर राज्य करण्यासाठी आणि भारताचा पैसा चीनमध्ये खेचण्यासाठी चीन अशा वस्तूंची निर्मिती करतंय. महत्त्वाचं म्हणजे आधी स्वस्ताईचं आमिष दाखवायचं आणि त्याच वस्तू नंतर महाग किमतीला विकण्याच्या... ही चीनची पद्धत लपून राहिलेली नाही. त्यामुळे चिनी वस्तू वापरायच्या का आणि कोरोनाबाबत संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चीनला हातभार लावायचा का, याचा विचार आता आपण करायलाच हवा.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com