कांगावाखोर चीन तोंडावर आपटला, दर्जाहीन टँकमुळेही चीनची जगभरात नाचक्की

कांगावाखोर चीन तोंडावर आपटला, दर्जाहीन टँकमुळेही चीनची जगभरात नाचक्की

आता बातमी चीनच्या खोटारडेपणाची. भारताची बदनामी करण्यासाठी चीनने आता सोशल मीडियाचा वापर सुरू केलाय. मात्र, सोशल मीडियावर चीन कसा तोंडावर आपटलाय. पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून.

भारत आणि चीनमध्ये गेल्या काही महिन्यांत विस्तवही जात नाहीय. सीमेजवळ चिनी घुसखोरीचा प्रयत्न भारताने हाणून पाडल्यानंतर चीन आता संपूर्णपण बावचळून गेलाय. म्हणून सोशल मीडियावर खोटारडा कांगावा करण्याची चाल चीन खेळू लागलाय. मात्र, चीनने केलेल्या कांगाव्यांमागचा भंपकपणा आता उघडा पडलाय.

चीनने हल्लीच एका मोठ्या फुग्याला रंग देऊन, हवा भरून हवेत सोडलं. आणि सोशल मीडियावर फुग्याला मिसाईल लॉन्चर असल्याची बतावणी केली. मात्र, हा फुगा एका बाजूने दबलेला असल्याने चीनचा खोटारडेपणा उघडा पडला. इतकंच नाही तर, चीनने मागे पाण्यात चालणाऱ्या टँकचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. महत्त्वाचं म्हणजे, तो टँक पाण्यात लागलीच बुडाल्यामुळे चीनची नाचक्की झाली.

वारंवार कुरापती करणाऱ्या चीनने सोशल मीडियातून भारताची बदनामी सुरू केली होती. पण, फुग्याच्या मिसाईल लॉन्चरचा खोटेपणा आणि टँकचा दर्जाहीनपणा उघडा पडल्याने चीनची जगभरात छी-थू होऊ लागलीय. त्यामुळे ज्या सोशल मीडियातून चीन हे उद्योग करतोय, त्याच सोशल मीडियावर चीनचे दात घशात गेलेयत, एवढं नक्की.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com