सावधान! राज्यात ढगफुटी वाढणार? शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा 

सावधान! राज्यात ढगफुटी वाढणार? शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा 

राज्यात ढगफुटी वाढणाराय असा दावा केला जातोय. पण, ढगफुटी झाली तर शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होईल. शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. मात्र, ही ढगफुटी का होतेय? आणि खरंच राज्यात ढगफुटी वाढणार आहे का? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहा.

गेल्या काही वर्षात राज्यात ढगफुटीच्या घटनेत वाढ झालीय. राज्यात ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी ढगफुटीमुळं मोठं नुकसान होतंय. आता अशाच अजून ढगफुटीच्या घटना घडणार असल्याचं म्हटलं जातंय. पण, खरंच राज्यावर ढगफुटीचं संकट आलंय का? एकाच दिवशी जोरदार पाऊस पडत असेल तर शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होईल. यामुळे याची आधीच पूर्वसूचना मिळणं गरजेचं आहे. आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ढगफुटींमुळे देशात अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाल्याच्या घटना गेल्या चार ते पाच वर्षात मोठ्याप्रमाणात घडल्यात. एकाच वेळी पडलेलं पाणी वाहून जाताना रस्ते, पुल, घरेही वाहून जाण्याचे प्रकार अनेकवेळा पहायला मिळतात. अनेकांना अशा पावसामुळे जीव गमवावे लागलेयत. पण, ही ढगफुटी का होते वाचा - 

 ढगफुटी का होते ?

  • जागतिक तापमानात वाढलंय
  • समुद्रात वाढलेल्या वादळांची संख्या, वादळांची तीव्रता वाढल्याने ढगफुटी होते
  • यापुढे वादळांची संख्या वाढणार. तापमानात वाढही मोठ्या प्रमाणात होणार 

त्यामुळे ढगफुटींची संख्या वाढणार असल्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिलाय. देशातील झाडांची संख्या कमी असल्यामुळे अशाप्रकारे ढगफुटी वाढल्याने नुकसानही मोठ्या प्रमाणात होणार आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत राज्यात ढगफुटीचं संकट वाढणार असल्याचा दावा सत्य ठरलाय.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com