डम्पिंग ग्राऊंडच्या कचर्‍याचे दूषित पाणी नागरिकांच्या घरात !

डम्पिंग ग्राऊंडच्या कचर्‍याचे दूषित पाणी नागरिकांच्या घरात !
Contaminated water from dumping ground waste in citizens homes

उल्हासनगर: उल्हासनगर Ulhasnagar कॅम्प क्रमांक ५ डम्पिंग ग्राऊंडच्या कचर्‍याचे दूषित पाणी नागरिकांच्या घरात आणि दुकानांत शिरले आहे. या डम्पिंग ग्राऊंडपासून पावसाळा सुरू होताच ओल्या कचर्‍याचा वास आणि मृत प्राण्यांच्या वासामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. Contaminated water from dumping ground waste in citizens homes

त्यात आज डम्पिंग ग्राउंड Dumping ground चे दूषित पाणी नागरिकांच्या घरात आणि दुकानात शिरल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला, त्यामुळे आज सकाळपासूनच स्थानिकांनी जोरदार आंदोलन सुरू केले. डम्पिंग ग्राउंड वर कचरा वाहून नेणारे ट्रक अडवण्यात आले. त्यामुळे अक्षरशः कचरा वाहून नेणाऱ्या ट्रक ची लाईन लागली होती. 

हे देखील पहा- 

डम्पिंग ग्राऊंडची क्षीण क्षमता कमी होत असल्याने, डम्पिंग ग्राऊंडकडे जाणार्‍या निवासी भागातील रस्ते व रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. दुर्गंध व आजाराने त्रस्त स्थानिक नागरिकांनी डम्पिंग ग्राऊंडवर जाणार्‍या कचरा वाहनांना थांबविले. डम्पिंग ग्राऊंड हटवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

Edited By-Sanika Gade
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com