सूचनांचं पालन न केल्यास कारवाई अटळ, गृहमंत्र्यांचा इशारा

सूचनांचं पालन न केल्यास कारवाई अटळ, गृहमंत्र्यांचा इशारा
anil deshmukh 960

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन न केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासनाकडून लोकांना विविध आवाहनं आणि सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. गर्दी टाळण्याचं, दुकानं बंद ठेवण्याचं तसंच गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असंही आवाहन अनिल देशमुख यांनी केलं आहे.

त्याचप्रमाणे, औषधांचं, सॅनिटायजरचा काळाबाजार करणा-यांवर कारवाई करणार असल्याचाही इशारा यावेळी अनिल देशमुख यांनी दिला आहे. आतापर्यंत कोरोनाचे 49 रुग्ण राज्यात आढळले आहे. आज 3 नवे रुग्ण आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 10 मार्च रोजी पुण्यात कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून ते आतापर्य़ंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या काही थांबायाचं नाव घेत नाही आहे. कोरोनाला रोखण्याचं सगळ्यात मोठं आव्हान सध्या सरकारसमोर आहे. सध्या भारतात कोरोनाची दुसरी फेज असून येत्या 15 दिवसांत कोरोनाला रोखणं, गरजेचं असल्यातं तज्ज्ञांचं म्हणणंय. 

corona virus home minster warns people marashtra marathi

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com