नक्की वाचा ! आता लॉकडाऊनपासून कधी मिळणार सुटका?

नक्की वाचा ! आता लॉकडाऊनपासून कधी मिळणार सुटका?


नवी दिल्ली : गुरुवारी वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर गृह मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी नव्या गाईडलाईन्स संदर्भात चर्चाही केली. ३१ मे रोजी येत्या १५ दिवसांसाठी लागू करण्यात येणारे दिशानिर्देश जाहीर केले जाऊ शकतात.केंद्र सरकारकडून एक नव्या गाईडलाईन्स आखण्याचं काम सुरू आहे. यानुसार, १ जूनपासून देशातील बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येईल. 'इकोनॉमिक टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, देशातील केवळ १३ शहरांत सोडून देशातील इतर भागांची मात्र लॉकडाऊनमधून सुटका होऊ शकते. हॉटेल, मॉल्स आणि रेस्टॉरन्ट देखील १ जूनपासून उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

 १ जूनपासून सार्वजनिक ट्रान्सपोर्ट सेवा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसहीत सुरू केली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमात लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबद्दल काही बाबी स्पष्ट करू शकतात.सर्वाधिक संक्रमण आढळलेली शहरं अर्थात, मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता/हावडा, इंदोर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवलूरमध्ये लॉकडाऊनचे नियम यापुढेही सुरू राहू शकतात.

हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरन्ट १ जूनपासून उघडण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. देशात सध्या हॉटेल्स सोडून हॉस्पीटॅलिटी सेवा संपूर्णत: ठप्प आहे. तसंच पोलीस, अधिकारी आणि आरोग्य सेवा यंत्रणा कार्यरत आहे.

WebTittle : Definitely read! When will you get rid of the lockdown now?


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com