चिमुटभर ड्रग्जमुळे दीपिका पदुकोणचं करिअर धोक्यात? तर बॉलिवूडचे 600 कोटी पाण्यात ?

चिमुटभर ड्रग्जमुळे दीपिका पदुकोणचं करिअर धोक्यात? तर बॉलिवूडचे 600 कोटी पाण्यात ?

बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानं सर्वांचेच धाबे दणाणलेत. ड्रग्ज प्रकरणात आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणचं नाव आल्यानं निर्माता-दिग्दर्शकांच्या पायाखालची वाळू सरकलीय. कारण संजय दत्तप्रमाणे दीपिकाही कायद्याच्या कचाट्यात सापडली तर बॉलिवूडचे कोट्यवधी रूपये पाण्यात जाऊ शकतात.

बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर एकामागोमाग एक दिग्गज अभिनेत्रींची नावंही पुढे येतायेत. त्यात सर्वात जास्त चर्चा आहे ती बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणची. दीपिकाचं व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाल्यानंतर तिच्याभोवती NCBच्या चौकशीचा फास आवळला जातोय. आत सर्वांनाच चिंता लागलीय ती तिच्या करिअरची. कारण संजय दत्तप्रमाणे दीपिकाही दोषी आढळली तर तिचं करिअर संपून जाईल आणि तसं झालं तर बॉलिवूडलाही त्याची मोठी आर्थिक झळ बसेल.

बॉलिवूडच्या 600 कोटींचं काय होणार ?
सध्याच्या घडीला दीपिकामुळे बॉलिवूडमध्ये 600 कोटी पणाला लागलेत. यात दोन बिग बजेट सिनेमे आणि 33 ब्रँड एंडोर्समेंटदेखील आहेत.

पाहा व्हिडिओ -

दिग्दर्शक मधु मंतेना यांच्या अनाम सिनेमाचं बजेट 200 कोटी इतकं आहे. तर 33 ब्रांड एंडोर्समेंटचं डील 300 कोटी इतकं आहे. दीपिका पादुकोण प्रत्येक एंडोर्समेंट साठी 8 ते 12 कोटी रूपये घेते 

जाणकारांच्या म्हणण्यानुसार दीपिकाची ब्रँड व्हॅल्यू ही रणबीर कपूर, रणवीर सिंह अशा स्टार अभिनेत्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे केवळ दीपिकाचंच नाही तर बॉलिवूडमधल्या अनेकांचं करिअर पणाला लागलंय असं म्हंटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com