कोल्हापुरात गर्भलिंगनिदानाचा पर्दाफाश, सील केलेल्या मशिनद्वारे गर्भलिंग निदान

कोल्हापुरात गर्भलिंगनिदानाचा पर्दाफाश, सील केलेल्या मशिनद्वारे गर्भलिंग निदान

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात एका डॉक्टरला गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडण्यात आलंय.. एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. पाहूयात एक रिपोर्ट

पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या मातृसेवा हॉस्पिटलमधल्या गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश करण्यात आलाय. छञपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या निवासी वैदयकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या गीता हसुरकर यांच्या सहकार्याने सापळा रचून गर्भलिंग निदानाचं एक मोठं रॅकेट उघडकीस आणलंय. 20 हजार रुपयांत गर्भलिंगनिदान करताना डॉ. अरविंद कांबळेला रंगेहात पकडण्यात आलंय. 

गंभीर बाब म्हणजे यापुर्वी डॉ. अरविद कांबळे याच्यावर विनयभंगाचे आरोप झालेत. याशिवाय गर्भलिंग निदानासाठी डॉ. कांबळे जे मशिन वापरत होता, ते मशीन 2016 पासून सील आहे. तरीही सील तोडून या मशीनचा अनधिकृत वापर सुरू होता. 

गर्भलिंग निदानाविरोधात कठोर कायदे करूनही गर्भलिंग निदानाला अद्यापही आळा बसलेला नाही. त्यामुळे आता सुजाण नागरिक म्हणून आपणच अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे. संभाजी थोरात, साम टीव्ही कोल्हापूर

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com