शेतकऱ्यांवर आता अस्मानी संकट, पाऊस आला आणि सगळी पिकं घेऊन गेला...

शेतकऱ्यांवर आता अस्मानी संकट, पाऊस आला आणि सगळी पिकं घेऊन गेला...

शेतकरी सुखी, तरच जग सुखी असं म्हणतात. पण, आपल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलंय. उस आडवा झालाय, पिकं भुईसपाट झालीयत. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाय.

पाहा सविस्तर व्हिडिओ- 

शेतकरी अतिपावसामुळे मेटाकुटीला आलाय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाय. उभा ऊस भुईसपाट झालाय. तर वेचणी आलेल्या कापसाच्या वाती होऊन अंकुर फुटलेयत. कधी विजांच्या कडकडाटाचा पाऊस. तर कधी ढगफुटी आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गोदावरी काठच्या शेतीची दाणादाण उडालीय. कापूस, सोयाबीन, मूग,भुईमूग, बाजरी, मका, तूर या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय.

तर सांगलीच्या आटपाडी तालुक्यात पावसाने कहर केलाय. अतिपावसामुळे तालुक्याचे हुकमी फळपीक असलेल्या हजारो एकर डाळिंबाचे क्षेत्र पाण्यात बुडालंय. यावर्षी आद्रता आणि पावसाने कहर केल्याने पाकळी करपा आणि फळकूज रोगाने धुमाकूळ घातलाय. यातच मुसळधार पावसामुळे हजारो एकर डाळींब बागा अक्षरशा पाण्यात बुडाल्यायत.

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात दमदार पाऊस झालाय. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेत पिकवलं होतं. मात्र, या नैसर्गिक आपत्तीमुळे मका आडवा झालाय. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिस्काऊन घेतलाय.

सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागच्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे हाताला आलेलं खरीप पीक सडतंय. तर कांदा पिकाच्या शेतात पाणी साचल्याने रेंदा झालाय. यामुळं दोन्ही जिल्ह्यातला शेतकरी मेटाकुटीला आलाय. आधीच शेतकरी संकटात आणि आता हे अस्मानी संकट आता तरी बळीराजाला मदत मिळणार का? भरपाई सरकार देणार का? हाच प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com