गाजलेल्या शेतकरी आंदोलनाची संपूर्ण कहाणी! मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लाल वादळाचं आंदोलन तापतं तेव्हा...

गाजलेल्या शेतकरी आंदोलनाची संपूर्ण कहाणी! मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लाल वादळाचं आंदोलन तापतं तेव्हा...

केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. शेतकरी आंदोलनात शरद पवारांची उपस्थिती आणि राज्यपालांच्या होऊ न शकलेल्या भेटीमुळे हे आंदोलन गाजलं.

आजचा दिवस गाजला तो अखिल भारतीय किसान सभेच्या आझाद मैदानातल्या आंदोलनाने. नाशिकहून निघालेलं शेतकऱ्यांचं हे लाल वादळ काल संध्याकाळीच मुंबईत धडकलं.

मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या या शेतकरी आंदोलनाला भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठावर शरद पवार आणि बाळासाहेब थोरातांसह अनेक बडे नेते सहभागी झाले होते. 

सभा आटोपून आंदोलकांनी राजभवनाकडे कूच केलं..मात्र पोलिसांनी या मोर्चाला मेट्रो सिनेमा चौकातच अडवलं. यावेळी काही काळ इथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

शेतकरी आंदोलकांनी राज्यपालांच्या भेटीचा निर्धार केला असला तरी राज्यपाल मात्र अगोदरच गोव्याला रवाना झाल्याने संतप्त आंदोलकांनी निवेदनाच्या प्रती फाडून निषेध व्यक्त केला. 

शेतकरी आंदोलकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर राज्यपाल कार्यालयाने तातडीने राज्यपालांच्या गैरहजेरीवर खुलासा केला. गोव्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने राज्यपालांची भेट शक्य नसल्याचं आंदोलकांना अगोदरच कळवल्याचं राज्यपाल कार्यालयाने स्पष्ट केलं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आझाद मैदानात या शेतकरी आंदोलकांनी ठिय्या दिलाय. प्रजासत्ताक दिनाचं ध्वजवंदन आटोपून या आंदोलनाची सांगता होणारेय. मात्र केंद्राच्या कृषी कायद्यांना आपला विरोध कायमच राहिल असा दावा आंदोलकांनी केलाय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com