कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल; वाचा काय आहे प्रकरण 

कोरोना रुग्णांच्या  नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल; वाचा काय आहे प्रकरण 
Saam Banner Template

हिंगोली - कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनानं Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. Filed a crime against the relatives of Corona patients

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने Government कडक निर्बंध लावले आहेत.यंदा महाराष्ट्रात Maharashtra तर कोरोनाने कहर केला असून उपचारा अभावी अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. तर हिंगोलीत Hingoli कोरोना वार्ड मध्ये प्रशासनाची नजर चुकवून बाधित रुग्णांनसोबत वास्तव्यास असणाऱ्या चाळीस नातेवाईकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत शहर पोलिसात गुन्हा दाखल Filed a crime करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

काही दिवसांपूर्वी  कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक हे कोरोनाचे सुपर स्प्रेंडर म्हणून रुग्णालयात फिरत असल्याची बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आली होती. त्या नंतर बाधित रुग्णांच्या नातेवाइकांना तरुणांसोबत राहण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. याबाबतचे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केले होते. Filed a crime against the relatives of Corona patients

मात्र तरी देखील अनेक नातेवाईक हे रुग्णालयात तळ ठोकून होते, हे नातेवाईक रुग्णांना घरचे जेवण यासह फळे व इतर साहित्य पुरवठा करत असल्याने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आरोग्य प्रशासनाने कळविले होते. दरम्यान या नातेवाईकांना वेळोवेळी समज देऊन देखील हा प्रकार थांबत नसल्याने, अखेर प्रशासनाने रुग्णालयात मध्यरात्री सरप्राइज भेट देत चाळीस नातेवाईकांन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com