कॅनरा बँकेकडून आदिवासी बांधवांना मदतीचा हात

कॅनरा बँकेकडून आदिवासी बांधवांना मदतीचा हात
बँक

मुंबई : कॅनरा बँकेच्या Canara Bank CSR (सामाजिक उत्तरदायित्व निधी) फंडातून निधी उपलब्ध करून कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी Tribal वाड्यांमध्ये अदिवासी बांधवाना तसेच गरीब-गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे Essentials व किराणा सामानाचे Groceries वाटप Distribution करण्यात आले. Helping Hand To Tribal Brothers By Canara Bank

हे देखील पहा -

पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडी, गिऱ्हाचीवाडी, देवपाडा, चिंचवाडी, वाघ्याचीवाडी, पोशीर चिकनपाडा याभागात किराणा सामानाचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील जवळपास 450 कुटुंबातील नागरिकांना जवळपास 7 लाख रुपये किंमतीच्या जीवनावश्यक साहित्याची मदत कॅनरा बँकेकडून करण्यात आली.

गेल्या जवळपास दीड वर्षांपासून कोरोनाचे Corona संकट जगावर आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशासह राज्यात वाढता कोरोनाचा धोका आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. Helping Hand To Tribal Brothers By Canara Bank

लॉकडाउन काळात अनेकांचे हाल होत आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेेल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर दुर्गम भागातील आदिवासींच्या मदतीसाठी कॅनरा बँकेच्या मुंबई Mumbai विभागाने देखील पुढाकार घेउन त्यांना 'एक हात मदतीचा' दिला आहे. कोरोनाकाळातील शासकीय नियमांचे पालन करत हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कॅनरा बँकेचे जनरल मॅनेजर लखबीर सिंह, डेप्युटी जनरल मॅनेजर अरुणकुमार मिश्रा, डेप्युटी जनरल मॅनेजर मनोजकुमार दास, यांच्यासह बँकेचे मुंबई विभागाचे पदाधिकारी तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com