VIDEO | गिलगिट-बाल्टिस्तान बळकाऊ पाहणाऱ्या पाकला भारताचा सज्जड दम. वाचा नेमकं काय घडलंय

VIDEO | गिलगिट-बाल्टिस्तान बळकाऊ पाहणाऱ्या पाकला भारताचा सज्जड दम. वाचा नेमकं काय घडलंय

आता बातमी पाकिस्तानच्या कुरापतीची.गिलगिट आणि बाल्टिस्तान हा आमचाच भाग असल्याचा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला भारताने सज्जड दम दिलाय. इतकंच नाही तर अनधिकृतपणे बळकावलेला हा भाग तातडीने रिकामा करण्याचा आदेशही भारताने दिलाय. पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून.

(गिलगिट-बाल्टिस्तानचे सुंदर शॉट्स वापरावे) हा जो नयनरम्य परिसर दिसतोय तो आहे गिलगिट-बाल्टिस्तानचा... याच परिसरावर पाकिस्तानने हक्क सांगितलाय. पण गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचाच अविभाज्य भाग असून तो ताबडतोब रिकामा करण्याचा इशारा भारताने पाकिस्तानला दिलाय. खरंतर कुरापतखोर पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांत म्हणून दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर भारताने पाकला हा सज्जड दम भरलाय.हेडर- गिलगिट-बाल्टिस्तान रिकामं करा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलगिट-बाल्टिस्तानवर हक्क सांगितला. त्यानंतर भारताने गिलगिट-बाल्टिस्तान हा आमचा अविभाज्य भाग असल्याचं सांगितलं. 1947 साली जम्मू-काश्मिर, लडाख आणि गिलगिट-बाल्टिस्तान भारताचा अविभाज्य भाग असल्याचं निश्चित झालंय. त्यामुळे, पाकिस्तानने अनधिकृतपणे केलेली घुसखोरी मागे घेत गिलगिट बाल्टिस्तान रिकामं करण्याचा इशारा भारताने दिलाय.
पाकिस्तानात निवडणुका असल्याने मतांसाठी इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे, त्याचसोबत निवडणुकांनंतर पॅकेज जाहीर करण्याचीही घोषणा केलीय. मात्र, आधीच आर्थिक पातळीवर पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं असताना आणि इवलासा जीव असूनही गिलगिट-बाल्टिस्तानवर हक्क सांगणाऱ्या पाकिस्तानला भारताने मोठी चपराक लगावलीय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com