मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचे राज्यभर पडसाद, 3 दिवसात आंदोलनाचा मराठा संघटनांचा इशारा

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचे राज्यभर पडसाद, 3 दिवसात आंदोलनाचा मराठा संघटनांचा इशारा

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळताच त्याचे पडसाद आता उमटू लागलेत. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या धक्क्यात एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. पाहुयात एक रिपोर्ट

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळताच त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या धक्क्यातून एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या किशोर कदम या तरुणाने चक्क चाकूर तहसील कार्यालयासमोर विषारी द्रव प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. 
 
दुसरीक़डे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे प्रवेशाचा अन् नोकरभरतीचा गोंधळ उडालाय. 

प्रवेशासह नोकरभरतीचा गोंधळ 

इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालानंतर राज्यभर प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन परीक्षा पुढच्या दोन महिन्यात होणार आहेत. पण  आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे विद्यार्थी, पालकांची चिंता वाढलीय. कारण ज्यांनी प्रवेश किंवा नोकरभरतीसाठी "एसईबीसी' प्रवर्गातून अर्ज केलेत, त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार की नाही याबाबत गोंधळ निर्माण झालाय.

मराठा तरुण शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी संघर्ष करतोय. मराठा आरक्षणामुळे लाखो तरुणांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होता. पण मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्यामुळे मराठा समाजासमोरच्या अडचणी वाढल्यात. ठाकरे सरकारनं इतर कायदेशीर बाबींचा तात्काळ विचार करुन पावलं उचलण्याची मागणी मराठा समाज करतोय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com