VIDEO | ही ब्लॅक माऊ बनली बाहुबली

VIDEO | ही ब्लॅक माऊ बनली बाहुबली

बाहुबलीचा पूर्वइतिहास सांगणारी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारंय. या वेबसीरिजची खासियत म्हणजे यात नागपूरची एक मांजर आपली कला दाखवणारंय. 

बाहुबली मांजर...जी आता बाहुबलीच्या वेब सीरिजमध्ये झळकणारंय. 
नागपुरातील अयोध्यानगरात राहणाऱ्या आदित्य राऊत यांना मांजरी पाळण्याचा आदित्यचा छंद आहे. त्यातील ही काळीशार मांजर बाहुबलीच्या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. आदित्य अगोदर या मांजरीला ब्लॅकी या नावाने हाक मारायचा. मात्र, तिची वेबसिरीजमध्ये निवड झाल्यापासून तिचं नाव त्यांनी हिरोईन असच ठेवलं.

जवळपास 22 मांजरींमधून त्यांच्या मांजरीची निवड करण्यात झालीय. महाराणीच्या शेजारी बसलेली ही मांजर वेबसीरिजमध्ये सर्वांच्या आकर्षणाचा विषय असेल. नागपुरात मात्र आतापासूनच ही बाहुबली मांजर सर्वांच्या चर्चेचा विषय बनलीय. या बाहुबली मांजरीमुळे आदित्य यांचंही नशीब फळफळलंय असं म्हणायला हरकत नाही. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com