VIDEO | ठाकरे सरकारमुळे विकासाला ब्रेक? फडणवीसांच्या निर्णयांचा फेरविचार?

VIDEO | ठाकरे सरकारमुळे विकासाला ब्रेक? फडणवीसांच्या निर्णयांचा फेरविचार?

फडणवीस सरकारने सुरू केलेले अनेक खर्चिक प्रकल्प सध्या ठाकरे यांच्या रडारवर आहेत. सर्वसामान्यांसाठी आवश्यक असलेल्याच प्रकल्पांना निधी देण्याच्या नावाखाली मागच्या सरकारच्या अनेक निर्णयांना ब्रेक लावला जाण्याची शक्यता आहे. कशी पाहुयात या सविस्तर पंचनाम्यातून...

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांचे आणि प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचे आदेश दिलेत. मागील ६ महिन्यात सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबतचा अहवाल मागविण्यात आलाय शिवाय विद्यमान सरकारच्या परवानगीशिवाय कोणतीही बिलं काढू नका, असं फर्मानही नव्य़ा मुख्यमंत्र्यांनी काढलंय. 

सध्या राज्यात सुरू असलेल्या खर्चिक प्रकल्पात एक लाख दहा हजार कोटींच्या बुलेट ट्रेनचा क्रमांक सर्वात वरचा आहे. त्या खालोखाल फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ४६ हजार कोटींचा समृद्धी महामार्ग हा प्रकल्प आहे. याशिवाय ७ हजार कोटींचा वर्सोवा-वांद्रे सी लिंक आणि जवळपास आठशे कोटींच्या ठाणे खाडी पुलाचा समावेश आहे. या सर्व योजनांचा आता फेरविचार केला जाणार आहे. 

याशिवाय आरे मेट्रो कारशेडलाही स्थगिती देत आरे आणि नाणार प्रकल्पविरोधातल्या आंदोलकांविरोधातील गुन्हेही मागे घेण्यात आलेत. 
आपलं सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी काम करेल असं उद्धव ठाकरेंनी दणक्यात जाहीर केलंय खरं. मात्र या कुरघोडीच्या राजकारणात भविष्यात राज्यासाठी महत्वाचे ठरू शकतील अशा प्रकल्पांचा बळी जाऊ नय़े एवढीच अपेक्षा...

Web Title - Break in development due to Thackeray government

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com