संत तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायची; सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात उल्लेख

संत तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायची; सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात उल्लेख

सर्व शिक्षा अभियानातल्या दुसऱ्या पुस्तकामुळे पुन्हा नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. गोपीनाथ तळवलकर यांनी लिहिलेल्या ‘संतांचे जीवन प्रसंग’ या पुस्तकात, तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख असल्याची बाब समोर आलीय. ''तुकाराम महाराजांची बायको फार रागीट,तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम  शिव्याच बाहेर यायच्या. ‘ते आमचं येडं’ असं आपल्या पतीला ती म्हणायची.

पण, मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त. काशी आणि महादू ही त्यांची मुले.” असा उल्लेख या पुस्तकात आहे.

छत्रपती संभाजी महाराजांविषयी चीड आणणारं लिखाण नुकतंच प्रकाशात आलं. आता संत तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख असल्याचं समोर येतंय. महापुरुष, संतपरंपरा यांचं जाणीवपूर्वक बदनामी करण्याचं तर हे षडयंत्र नाही ना अशी शंका घ्यायला वाव आहे.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com