महागाईचा राक्षस चहाच्या मानगुटीवर... कटिंग चहा महागणार...

महागाईचा राक्षस चहाच्या मानगुटीवर... कटिंग चहा महागणार...

कटिंग चहा महागणार. सर्वसामान्यांना महागाईच्या भडक्याने आणखी एक धक्का दिलाय. जो चहा पितापिता महागाईवर मनसोक्त चर्चा झडत होत्या. तो चहा पिणं सुद्धा आता महाग होणारए.

कधी कांदा... कधी भाजी... कधी घर... कधी गाडी... काय काय महागतंय याचा पत्ता नाही. अशात या सगळ्या महागाईवर महाचर्चा करण्याची हक्काची जागा म्हणजे चहाची टपरी. पण आता तर या टपरीवर जाणं सुद्धा महागणार आहे... कारण सामान्यांचा कटिंग चहा आता महाग होणारए. चहाच्या किमतीत एक ते दोन रुपयांनी वाढ होणारए.

चहा महाग झाला हे ऐकून चहाप्रेमीही संतापलेत.. 

 काही जण असंही म्हणतील की चहा एक-दोन रुपयांनी महागला तर त्यात इतकं काय? जर महिन्याचा हिशेब केलात तर या महागाईचा चटका तुम्हाला लक्षात येईल.

गरिबांचा कटिंग महागला

एक माणूस दिवसाला 3 कटिंग पित असेल आणि समजा एका कटिंगमध्ये दोन रुपयांची दरवाढ झाली. तर त्या व्यक्तीला आठवड्याचे 42 रुपये म्हणजेच महिन्याचे 180 रुपये जास्तीचे द्यावे लागणारएत.

तेव्हा हळूहळू डोकं वर काढणारी ही महागाई, आपलं महिन्याचं बजेट कसं कोलमडतेय. याचा अंदाज तुम्हाला येईल. जेव्हा पुढच्या वेळी हातात चहा घेऊन महागाईवर गप्पा माराल, तेव्हा तुमच्या चहातही महागाईचा राक्षस उतरलाय याची फक्त जाणीव ठेवा.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com