म्हणे 'पवार माझी जात काढतात'; फडणवीसांच्या निशाण्यावर पवार

म्हणे 'पवार माझी जात काढतात'; फडणवीसांच्या निशाण्यावर पवार

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला होता. आता फडणवीसांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलंय. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दर वेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते, हे माझ्या नेतृत्त्वाचे यश आहे. मला लोक नेता मानतात की नाही मानतात, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण पवार साहेब हे पुरोगामी नेते आहेत. ते तसा थेट उल्लेख करू तर शकत नाहीत. पण अप्रत्यक्षरित्या त्यांना माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते, हे माझ्या नेतृत्त्वाचे यश आहे.

फडणवीसांनी केलेलं हे वक्तव्य म्हणजे अजूनही शरद पवार विरूद्ध फडणवीस हा सामना संपला नसल्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पाया गेल्या पाच वर्षांत खिळखिळा केल्याने फडणवीस म्हणून तुमच्याबद्दलचा राग शरद पवारांना आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिलंय. 

फक्त एवढे बोलून फडणवीस थांबले नाहीत, तर मोदी-पवार भेटीवरही त्यांनी सूचक भाष्य केलं. 
अजित पवारांशी भाजपने केलेली हातमिळवणी किंवा पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली चर्चा यात पडद्यामागे आणि `बिटविन द लाइन` बरेच काही आहे. ते योग्य वेळी बाहेर काढेन
याशिवाय विरोध पक्षनेते म्हणून महाविकास आघाडी सरकारलाही त्यांनी इशारा दिलाय. 
"तीन पक्षांचे सरकार चालल्याचा  इतिहास देशात तरी नाही. मात्र विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला सुरवातीच्या काळात मी कठोरपणे विरोध करणार नाही. त्यांना योग्य संधी देईन"

राजकारणातलं पवार युग संपल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या निकालापुर्वी केला होता. मात्र फडणवीसांचे बोल अवघ्या महिन्याभरात खोटे ठरवत पवारांनी अजूनही महाराष्ट्रात आपलाच शब्द चालतो याची चुणूक दाखवून दिली. आता फ़डणवीसांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधलाय.फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता पवार काय उत्तर देणार हे पाहणं औत्सूक्याचं ठरणार आहे.

Web Title - Marathi News Devendra Fadanvis statement on sharad pawar 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com