इम्युनिटीसाठीची औषधं घेताय? मग ही बातमी वाचाच...

इम्युनिटीसाठीची औषधं घेताय? मग ही बातमी वाचाच...

कोरोनाचं संकट आल्यापासून प्रत्येकजण रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय, मात्र हीच इम्युनिटी पॉवर वाढवणारी औषधं नव्या आजारांना निमंत्रण देतायत.

संपूर्ण जगालाच कोरोनानं मगरमिठी मारलीय. लसींवर संशोधन सुरू आहेच, पण,  संपूर्ण जगाला कोरोनाला सोबत घेऊनच जगावं लागणार आहे असा सल्लाही दिला जातोय, म्हणून कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येकजण रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक औषधं घेतायत. पण हीच सप्लिमेंटरी मेडिसीन नव्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात, असा तज्ज्ञांचा होरा आहे.

व्हिटॅमिन A च्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्यास डोळ्यांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचसोबत व्हिटॅमिन C च्या गोळ्या जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटदुखी, उलटी, जुलाबासारखे त्रास होऊ शकतात. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन D च्या अतिसेवनामुळे मांसपेशी आखडण्याची आणि मूतखडा होण्याची भीती नाकारता येत नाही.

याचाच अर्थ असा होतो की, कोरोनापासून वाचण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवायला हवीच, मात्र त्यासाठी आहारात बदल करण्याला प्राधान्य द्यायला हवं, आणि गरज पडली तरच औषधं घ्यायला हवीत. तीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच. नाहीतर, कोरोनाशी लढताना इतर आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com