भारतीय जवानांच्या कारवाईमुळे चीन बिथरला, तरीही चीनच्या पोकळ धमक्या सुरूच 

भारतीय जवानांच्या कारवाईमुळे चीन बिथरला, तरीही चीनच्या पोकळ धमक्या सुरूच 

सीमेवर भारत आणि चीनमधील तणाव कायम आहे. 29 आणि 30 ऑगस्टला चिनी सैन्यानं पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. यानंतर चिनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं भारताला उघड उघड धमकी दिलीय. काय आहे चिन्यांची धमकी पाहा-

आधी गलवान आणि आता लडाखमधील पँगाँग सरोवराचा परिसर. भारतीय सैन्यानं चीनच्या घुसखोर जवानांना हाकलून लावल्यानंतर चीन चांगलाच खवळलाय. एकीकडे समझौत्यासाठी चर्चा सुरू असताना दुसरीकडे चीननं धमकीची भाषा केलीय. भारताला आमच्यासोबत स्पर्धा करायची असेल तर 1926 पेक्षाही जास्त नुकसान होईल अशी धमकी चिनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्समधून देण्यात आलीय. भारतात कोरोना रूग्णांची संख्या वाढतीय. भारताची अर्थव्यवस्था कोलमडलीय. म्हणून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही चीनच्या या वृत्तपत्रात म्हंटलंय. अर्थात चीननं भारताविरोधात लिखाण करून भारताला धमकी दिली असली तरी आताचा भारत हा 1962 सालचा भारत नाही हे देखील चीनने लक्षात घ्यायला हवं. 

दोन्ही देशांची तुलना केली तर भारताचं लष्करी सामर्थ्य चीनच्या तोडीस तोड आहे. भारताच्या ताफ्यात दहा अग्नि क्षेपणास्त्र आहेत. ज्यामुले शिनजियांग, चौंगक्विंग सारख्या चीनच्या मोठ्या भागाचं प्रचंड नुकसान होऊ शकतो. भारताकडे अण्विक शस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या लढावू विमानांचं भांडार आहे. त्यात मिराज-2000 आणि जाग्वार सारखी विमानं देखील आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार भारताकडे प्रचंड अण्विक सामर्थ्य आहे ज्याच्या गुप्ततेमुळे शुत्रूराष्ट्र भारताबाबत भ्रमात आहेत. 

भारताच्या तुलनेत चीनकडे DF-21 श्रेणीतील क्षेपणास्त्र आहेत. जे भारताच्या मोठ्या शहरांना लक्ष्य करू शकतात. चीनकडे एक डझनहून DF-31, DF-31 A क्षेपणास्त्र आहेत.याशिवाय भारताच्या पूर्व भागाला लक्ष्य करू शकतील अशी क्षेपणास्त्र चीनच्या ताफ्यात आहेत. 

क्षेपणास्त्रांच्या बाबतीत दोन्ही देश तुल्यबळ असले तरी चीनला जशास तसं उत्तर देण्याची ताकद भारतामध्ये अधिक आहे. सध्या चीन एक कुटील राष्ट्र आहे. कोरोनामुळे तर सर्वांनीच चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यामुळेच चीनच भारतासोबत खुसपट काढून उगीगच शेखी मिरवण्याचा प्रयत्न करतोय हे उघड आहे. हा भारत 1962 सालचा भारत नाही हे देखील चीननं समजून घ्यायला हवं. अन्यथा त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटायला फारसा वेळ लागणार नाही.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com