VIDEO | 'तो' नवरा मुलगा चोर आहे! 52 महिलांना लाखोंचा गंडा

VIDEO | 'तो' नवरा मुलगा चोर आहे! 52 महिलांना लाखोंचा गंडा

हा आहे संपत चांगदेव दरवडे. उर्फ मनोज पाटील उर्फ मयूर पाटील. संपतच्या नावांची यादी इथवरच संपत नाही. ती लांबतच जाते. या महाभागाचा बाजार उठला. तेव्हाचा हा प्रसंग. 

या संपतचं 2014 साली आरती नावाच्या एका मुलीशी लग्न झालं. तेव्हा त्याच्या डोक्यावर 13 लाखांचं कर्ज होतं. त्याच दरम्यान त्याची ओळख काही घटस्फोटीत महिलांशी झाली. लग्नाचं आमिष दाखवलं की पैसे उकळता येतात हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्यांनं नागपूर, पुणे, सिंधुदुर्गासह अनेक भागांतून 52 महिलांना फसवलं. फसवणुकीसाठी तो घटस्फोटीत, विधवा आणि विवाहेच्छुक महिलांनाच निवडत असे. नाशिकमध्ये त्यानं असंच एक जाळं टाकलं आणि त्यातच तो अडकला. फसगत झालेल्या सगळ्या जणी एकत्र आल्या आणि नगरच्या या लखोबा लोखंडेचं पितळ नाशकात उघडं पडलं

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com