पीपीई किटमध्ये येणाऱ्या घामावर पुण्याच्या तरुणानं शोधली 'कोव्ह- टेक व्हेंटिलेटर सिस्टिम'

पीपीई किटमध्ये येणाऱ्या घामावर पुण्याच्या तरुणानं शोधली 'कोव्ह- टेक व्हेंटिलेटर सिस्टिम'
Pune Youth Invented Co-vent System for PPE Kit

पुणे : कोरोना काळात डॉक्टर व नर्स, तसेच अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीए किट घालून काम करावं लागतं आहे .सारखी गरमी व पीपीए किट चा त्रास होऊ नये, घाम येऊ नये म्हणून पुण्यातील युवकाने कोव्ह- टेक व्हेंटिलेटर सिस्टम बनविले आहे. Pune Youth Invented Co-vent System for PPE Kit

कोरोनाच्या काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णालयात जेव्हा पीपीई किट घालून 12 -12 तास काम करावे लागते, तेव्हा या डॉक्टरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सर्वाधिक त्रास म्हणजे पीपीई किट घालून काम करत असताना मोठ्या प्रमाणात घाम येतो आणि या घामामुळे या डॉक्टरांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.

हे देखिल पहा

मात्र आत्ता या पीपीई किट घालून येणाऱ्या घामावर पुण्यातील 19 वर्षीय इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने कोव्ह- टेक व्हेंटिलेटर सिस्टम बनविले आहे. या सिस्टमद्वारे पीपीई किट घालून काम करताना घाम येणार नसल्याचा दावा त्याने केला आहे. निहाल सिंग आदर्श असे त्याचे नाव आहे.

पुण्यात राहणाऱ्या निहालची आई डॉक्टर असल्याने डॉक्टर परिचारिका वैद्यकीय कर्मचारी यांना पीपीई किट मध्ये काय त्रास होतो, घामामुळे बुरशीजन्य आजारांचा धोका कसा संभवतो याची त्यांना कल्पना होती. निहाल फर्स्ट इयरमध्ये असताना त्याला कोविड रिलेटेड एक प्रोजेक्ट करायचे होते. त्याने त्याच्या आईला कोविडमध्ये काम करत असताना काय त्रास होतो, याबाबत माहिती घेतली असता, त्याला पीपीई किटमुळे होणाऱ्या त्रासाबाबत आईने माहिती दिली. Pune Youth Invented Co-vent System for PPE Kit

या माहितीच्या आधारावर निहालने अभ्यास करून यावर उपाय शोधून काढला. त्याने सुरुवातीला व्हेंटिलटरची संकल्पना कागदावर रेखाटली आणि त्याचा एक डायग्राम कागदावर रेखाटला. त्यानंतर महाविद्यालयातील मित्रांच्या मदतीने त्याने व्हेंटिलेटर सिस्टम किट बनवायला सुरुवात केली. आता या मुळं पीपीई किट वापरणाऱ्या डॉक्टरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Edited By - Amit Golwalkar 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com