कोविड रुग्णालयातील बाऊन्सर प्रकरणी गृहराज्यमंत्री नाराज
Shambhuraj Desai Unhappy about Bouncers appintment at satara covid Centre

कोविड रुग्णालयातील बाऊन्सर प्रकरणी गृहराज्यमंत्री नाराज

सातारा : येथील जम्बो कोविड सेंटर बाहेर गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षते साठी बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत. या बाबतीत साताऱ्यातील सामाजिक संघटना तसेच रुग्णांचे नातेवाईक यांनी प्रसारमाध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ही गोष्ट गांभीर्याने घेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हाधिकारी सातारा यांच्याशी याबाबत चर्चा केली. Shambhuraj Desai Unhappy about Bouncers appintment at satara covid Centre

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या या नव्या इमारतीत जिल्हा कोव्हिड जम्बो रुग्णालयाची निर्मिती केली. हे कोविड रुग्णालय विविध कारणातून सध्या चर्चेत येत आहे. याठिकाणी बाऊन्सरची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे देखिल पहा

रात्री आणि दिवसा असे चौदा बाऊन्सर जम्बो रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आले होते. वास्तविक पाहायला गेलं तर जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे रुग्णांचे मोजकेच नातेवाईक या कोव्हिड  जम्बो रुग्णालयात येत आहेत. मात्र बाऊन्सरची नियुक्ती केल्यामुळे त्यांना आता गेटवरच थांबायची वेळ आली. त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत सामाजिक संस्थांनी विरोध दर्शविला. रुग्णालय बाहेरील बाऊन्सर हटवा अन्यथा तीव्र आंदोलन करुन असा इशारा त्यांनी दिला. Shambhuraj Desai Unhappy about Bouncers appintment at satara covid Centre

तिथल्या व्यवस्थापनाने स्वतः च्या सुरक्षते साठी हे बाउन्सर ठेवल्याचे समोर आले असून या बाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यवस्थापनाचे कान टोचत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या वेळी बोलत असताना ते म्हणाले ''महाराष्ट्र पोलीस नागरिकांच्या रक्षणासाठी सज्ज असतात.  त्यामुळे कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नसणे ही बाब चुकीची आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी सातारा आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांची बैठक घेऊन हा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत. 
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com