VIDEO | मनसेकडून शिवसैनिकांना साद

 VIDEO | मनसेकडून शिवसैनिकांना साद

मनसेचं महाअधिवेशन जवळ आलं असताना पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्यात. नाराज आणि असंतुष्ठ शिवसैनिकांना खेचण्याची रणनीती मनसेकडून आखण्यात आलीय. लाचारीचा तिटकारा असणाऱ्यांनी राज ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारावं अशआ आशयाचं ट्विट संदीप देशपांडेंनी केलंय. संदीप देशपांडेंचं हे ट्विट म्हणजे शिवसेने नेतृत्वाला अप्रत्यक्ष टोला मानला जातोय. 

मनसे सोडून गेलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर जुने शिलेदार पुन्हा मनसेत सामील होणार का, याची चर्चा सुरू झाली. अशातच आता मनसे नेते संदीप देशपांडेंनी शिवसैनिकांना अप्रत्यक्षपणे साद घातलीय. आता या आवाहनाला नाराज कार्यकर्ते, नेते प्रतिसाद देतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com