अकोल्यात शिवसेनेची पाच व्हेंटिलेटरची मदत

अकोल्यात शिवसेनेची पाच व्हेंटिलेटरची मदत
akola shivsena

अकोला- अकोल्यात Akola आज शिवसेनेच्या Shivsena वतीने जिल्हा प्रशासनाला पाच व्हेंटिलेटरची ventilator मदत Help करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख Nitin Deshmukh यांनी पाच व्हेंटिलेटर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर Jitendra Papalkar यांना सुपूर्द केले. अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबर मृतांचा आकडा ही दिवसेंदिवस वाढत आहे. अपुरे बेड, कमी व्हेंटिलेटर यामुळे रुग्णाला वाचवण्यासाठी आरोग्य विभागाला धडपड करावी लागत आहे. ShivSena help for five ventilators in Akola

हे  देखील पहा -

हेच बाब लक्षात घेत शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पाच व्हेंटिलेटरची मदत केली. यानंतरही मदतीसाठी शिवसेना नेहमी तत्पर असेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. विविध पक्ष आता कोरोना काळात मदतीसाठी सरसावले असुन  वंचित बहुजन आघाडी, शिवसेना , भाजप आदि पक्षाच्या वतीने मदत करण्यात येत आहे. 

विशेष म्हणजे यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषद मार्फत कोव्हीड सेंटरची उभारणी केली. दरम्यान कोरोनाच्या या कठीण काळात इतर पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन सर्वतोपरी मदत करणे गरजेचे आहे. कारण जो समाजकारण करतो तो राजकारनात पुढे जातो. ShivSena help for five ventilators in Akola

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com