भंडाऱ्यात परीस्थिती गंभीर...!मृत्यू पूर्वीच सरण रचून ठेवण्याची आली वेळ

भंडाऱ्यात परीस्थिती गंभीर...!मृत्यू पूर्वीच सरण रचून ठेवण्याची आली वेळ
Crematoruim in Bhandara

भंडारा : कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत Second Wave भंडारा जिल्ह्यात परिस्थिती अतीगंभीर होताना दिसत असून भंडाऱ्याच्या स्मशानभूमीत याची प्रचिती आली आहे. भंडारा स्मशानभूमीत कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळालं. मृत्यु पूर्वीच सरण रचुन ठेवण्याची दुर्देवी वेळ भंडारा प्रशसानावर आली असून एकाच वेळी २० ते २५ कोरोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.Situation of Corona in Bhandara District becoming Grim

भंडारा Bhandara जिल्ह्यात कोरोनाचे तांडव सुरु असून दररोज मृतांचा आंकड़ा वाढत आहे. भंडारा शहरालगत गिरोला स्मशानभूमीत Crematorium रोज २० ते २५ लोकांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. कुणाला अंत्यसंस्करांसाठी तात्कळत राहण्याची वेळ येऊ नये म्हणून आता भंडारा जिल्हा प्रशासनाकडून अगोदरच सरण रचुन ठेवले जात आहेत. त्यासाठी दररोज 2 ते 3 ट्रक लाकूड लागत आहे.

तर भंडारा जिल्ह्यात आता पर्यंत ६७२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यु झाला असून भंडारा नगर परिषदेचे पाच कर्मचारी अहोरात्र मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. हे चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून येत असून स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे आता चक्क जमीनीवरच सरण रचण्यात येत आहे. Situation of Corona in Bhandara District becoming Grim

भंडारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. भंडाऱ्यातिल हे चित्र पाहून अनेकांना रडू देखील कोसळल्याचे पाहायला मिळाले आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com