माझ्या बहिणीच्या मृतदेहाची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई करा

माझ्या बहिणीच्या मृतदेहाची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई करा
beed

बीड : कोरोना Corona बाधित महिलेचा Woman मृतदेह Death Body बीड Beed जिल्हा रुग्णालयातून District Hospital, नातेवाईकांनी परस्पर पळवून घेऊन गेलेल्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतले आहे. मृत महिलेच्या भावाने, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी यांनी, मृतदेहांची अवहेलना Contempt केल्याचा आरोप Allegation करत, पोलीस अधीक्षक SP यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. Take Action Against Those Who Desecrated My Sister's Body; Brother Demands 

माझी बहीण निगेटिव्ह असताना तिचा मृतदेह सुरुवातीला आम्हाला घेऊन जाण्यास सांगितले मात्र मृतदेह घरी घेऊन जात असतानाच आम्हाला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अर्ध्या वाटेतून बोलवून घेतलं आणि उलट आमच्याच विरोधात मृतदेह पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अगोदरच दुःख आणि त्यात मानसिक त्रास होत आहे. असे मृत महिलेचा भाऊ ऍड.सुभाष काबाडे यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा -

तसेच जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते, अतिरिक्त शल्यचिकित्सक सुखदेव राठोड, वार्डातील वैद्यकीय अधिकारी गुट्टे, कर्मचारी, वार्ड बॉय यांनी आमची दिशाभूल करून मृतदेहाची अहवेलना केली आहे. त्यामुळे संबंधितांविरोधात रीतसर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे . Take Action Against Those Who Desecrated My Sister's Body; Brother Demands 

बीड जिल्हा रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 5 मधून, सकाळी नातेवाईकांनी मृतदेह परस्पर वैद्यकीय तपासणी न करता घेऊन गेल्याची तक्रार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बीड शहर पोलिसांना Police केली होती. या तक्रारीनंतर संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर आता नातेवाईकांनी आरोग्य प्रशासनावर मृतदेहाचे अहवेलना केल्याचा आरोप लावला आहे.

मयताच्या भावाने सांगितले , की आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संमतीने आम्ही मृतदेह घेऊन गेलो होतो. आणि मृत देहाची अँटिजेन टेस्ट निगेटीव्ह असल्यामुळे मृतदेह घेऊन जाण्यास परवानगी दिली होती. Take Action Against Those Who Desecrated My Sister's Body; Brother Demands 

पहाटे चार वाजता मृत्यू झाला होता. त्यानंतर सकाळी टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून आम्ही विनंती केली, की आमच्या रुग्णाचा मृत देह ताब्यात द्या. यावर रुग्णालय प्रशासनाने संमती दर्शवत मृतदेह घरी नेण्यास सांगितले मात्र अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलो होतो , गाव अवघ्या पाच ते दहा मिनिटे अंतरावर असतांना मृतदेह पुन्हा परत घेऊन या म्हणून आरोग्य प्रशासनाचा फोन आला.

मग तशीच गाडी आम्ही मागे घेऊन रुग्णालयात आलो आणि मृतदेह ताब्यात दिला. प्रशासनाला सहकार्य केले तरी पण रुग्णालय प्रशासनाने आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला हे चुकीचे आहे असे मृत महिलेच्या भावाने सांगितले आहे. Take Action Against Those Who Desecrated My Sister's Body; Brother Demands 

जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते, अतिरिक्त शल्य चिकित्सक सुखदेव राठोड, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी गुट्टे सर यांनी आमची दिशाभूल करून मृतदेहाची अवहेलना केली आहे. मृत देहाची दोन वेळा अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली होती.

कर्मचाऱ्यांच्या समोरून आम्ही मृतदेह घेऊन गेलो होतो.  मात्र आमच्यावर मृतदेह पळवून नेल्याचा आरोप रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी लावत आहेत. असे ऍड सुभाष काबाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या विरोधात आम्ही पालकमंत्री यांच्याकडे न्याय मागणार आहोत असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com