अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत भारतीय वंशाच्या 12 उमेदवारांचा विजय

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत भारतीय वंशाच्या 12 उमेदवारांचा विजय

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसह राज्य पातळीवरही निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या तब्बल 12 उमेदवारांनी विजय मिळवलाय. 

हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्हसमध्ये भारतीय वंशाचे चारही जण निवडून आलेत. डॉ. एमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती यांचा समावेश आहे. 

नीरज अंतानी हे ओहियो सिनेटमध्ये पोहोचणारे पहिले अमेरिकन-भारतीय आहेत. 

जय चौधरी हे नॉर्थ कॅरोलिना स्टेट सिनेटमधून दुसऱ्यांदा निवडून आलेत. 

अमीश शहा हे अॅरिझोना स्टेट सिनेटमधून, निखिल सावल हे पेन्सिल्व्हॉनिया स्टेट सिनेटमधून, राजीव पुरी मिशिगन स्टेट सिनेटमधून, जर्मी कोने हे न्यूयॉर्क स्टेट सिनेटमधून, अॅश कालरा कॅलिफोर्नियातून तर रवी सेंदिल हे टेक्सास डिस्ट्रिक कोर्ट पोल्समध्ये विजयी ठरलेत.

जेनिफर राजकुमार या न्यूयॉर्क स्टेट असेम्बली, निमा कुलकर्णी केंटुकी स्टेट हाऊस, केशा राम वर्मोन्ट स्टेट सिनेट, वंदना स्लेटर या वॉशिंग्टन स्टेट हाऊस आणि पद्मा कुप्पा या मिशिगन स्टेट हाऊसमधून निवडून आल्यात.

अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ही संपूर्ण जगासाठीच महत्त्वपूर्ण निवडणूक मानली जाते. यंदाची ही निवडणूक भारतीय लोकांसाठी आनंददायी ठरलीय. कारण यंदाच्या या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या अनेक उमेदवारांनी बाजी मारलीय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com