वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात व्हेंटिलेटर धूळखात पडून
Ventilatros lying Unused in Amit Deshmukhs District

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात व्हेंटिलेटर धूळखात पडून

लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या Amit Deshmukh लातूरातुन Latur एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकीकडे कोरोनाचा कहर असताना गतवर्षी जिल्ह्यातील १२ ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आलेले १२ व्हेंटिलेटर Ventilator हाताळण्यासाठी तज्ञ कर्मचारी नसल्याने वापराविना एक वर्षांपासून धूळखात पडून आहेत. याविषयी औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी ही व्हेंटिलेटर तात्काळ चालू करण्याची मागणी केली आहे. Ventilatros lying Unused in Amit Deshmukhs District

गतवर्षी कोरोना महामारीच्या Corona Pandamic काळात जिल्ह्यातील १२ ग्रामीण रुग्णालयाना Rural Hospital प्रत्येकी एक असे १२ व्हेंटिलेटर देण्यात आले होते. सदरचे व्हेंटिलेटर हाताळण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे होते. पण दुर्दैवाने डॉक्टर अथवा अन्य कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले नाही. यामुळे सदरचे व्हेंटिलेटर वापरावीना धूळखात पडून आहेत. 

हे देखिल पहा - 

लातूर जिल्ह्यात औसा, किल्लारी, कासार शिरसी, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर, जळकोट, चाकूर, बाभळगाव, मुरुड, रेणापूर, नळेगाव व देवणी येथे ग्रामीण रुग्णालय आहेत. Ventilatros lying Unused in Amit Deshmukhs District

सदरचे व्हेंटिलेटर बंद असल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. हेच व्हेंटिलेटर चालू असते तर अनेक नागरिकांचे जीव वाचले असते. लातुरचे पालकमंत्री हे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत आणि इथं हा प्रकार होणं अत्यंत दुर्दैवी आहे. याबाबत आमदार अभिमन्यू पवार Abhimanyu Pawar यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोनवर संपर्क केला असून सदरचे व्हेंटिलेटर तात्काळ चालू करण्यात यावेत, अशी मागणी पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्याकडे केली आहे
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com