VIDEO |अजित पवारांनी केला अनोखा विक्रम

VIDEO |अजित पवारांनी केला अनोखा विक्रम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर क्रमांक दोनचे नेते मानले जाणारे अजित पवार यांनी यंदा सत्ताकारणाच्या खेळात कमालच केलीय. अवघ्या सव्वा महिन्याच्या फरकाने त्यांनी दोनदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय.

भाजपबरोबर सत्तास्थापन करत २३ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. या सत्ता नाट्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. भाजपशी सलगी केली तरी बहुमताचा आकडा गाठणं शक्य नसल्याचं ओळखून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि फडणवीस सरकार कोसळलं.
या राजकीय घडामोडीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. आणि या मंत्रिमंडळाच्या विस्तारात  सव्वा महिन्यापूर्वी बंड करणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


यापुर्वी अजित पवारांनी नोव्हेंबर २०१० मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. विशेष म्हणजे राज्यपाल कोश्यारींनी दोनदा अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिलीय. शिवाय काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे ते एकमेव नेते ठरलेत. 
 

WebTittle :  VIDEO | Ajit Pawar makes a unique record

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com