VIDEO | मनसेकडून औरंगाबादचा 'संभाजीनगर' असा उल्लेख

VIDEO | मनसेकडून औरंगाबादचा 'संभाजीनगर' असा उल्लेख

मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी औरंगाबाद शहरात लावलेल्या बॅनर्सवर औरंगाबादचा उल्लेख पहिल्यांदाच संभाजीनगर असा करण्यात आलाय. मुळात संभाजीनगर हा शिवसेनेचा हक्काचा मुद्दा... पण, हाच मुद्दा आता राज ठाकरेंनी उचलल्याचे स्पष्ट संकेत या बॅनर्सवरून देण्यात आलेयत. हाच मुद्दा औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत मनसेकडून वापरला जाण्याची शक्यता आहे. तर याच मुद्द्यावरून शिवसेनेनं मनसेला खडेबोल सुनावलेयत. 

यापूर्वी कधीही मनसेनं औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला नव्हता. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा शिवसेनेचं संभाजीनगर हे नामकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हायजॅक करत असल्याचं चित्र दिसून येतंय.
 

WebTitle :: VIDEO | Aurangabad refers to 'Sambhajinagar' by MNS


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com